SL Vs NZ: श्रीलंकेने उडवली 'किवीं'ची दाणादाण; १ डाव १५४ धावांनी विजय, आता काय असणार WTC चे समीकरण?
राजधानी: एका बाजूला भारत आणि बांग्लादेश यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरू असताना दुसरीकडे न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात देखील दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. दरम्यान दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात न्यूझीलंड संघावर श्रीलंकेचा संघ वरचढ ठरला आहे. कारण दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला आहे. श्रीलंकेने न्यूझीलंडवर आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे. १ डाव १५४ धावांनी न्यूझीलंडचा पराभव केला आहे. तसेच या मालिकेत श्रीलंकेने न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिल आहे.
श्रीलंकेने २००९ नंतर मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. श्रीलंकेने आपला पहिला डाव हा ५ बाद ६०२ धावांवर घोषित केला. न्यूझीलंडच्या गोलदाजांनी लंकेच्या फलंदाजांसामोर शरणागती पत्करली. श्रीलंकेकडून तिघांनी शतकी खेळी केल्याने श्रीलंकेला एक सन्मानजनक स्कोअर उभा करता आला. दिनेश चांदीमल यांनी ११६ धावांची खेळी केली. तर कुशल मेंडिस आणि कमिंदू मेंडिस हे नाबाद परतले. न्यूझीलंडकडून फिलिप्स याने सर्वाधिक ३ गडी बाद केले.
श्रीलंकेने ६०० धावांचा डोंगर उभा केला. त्यासमोर न्यूझीलंडचा डाव हा केवळ ८८ धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्या याने सर्वाधिक ६ गडी बाद केले. ५१४ धावांनी मागे असल्याने न्यूझीलंडला फॉलोअनसाठी मैदानात उतरावे लागले. तर या वेळेस देखील श्रीलंकेने उत्तम गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघाला ३६० धावांवरच रोखले. त्यामुळे श्रीलंकेने न्यूझीलंडला १ डाव आणि १५४ धावांनी पराभूत केले आहे.
A thumping win for Sri Lanka in Galle 💪#WTC25 | #SLvNZ 📝: https://t.co/MBQXWEOCeW pic.twitter.com/Uo6TmIdocc
— ICC (@ICC) September 29, 2024
WTC चे समीकरण काय?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारत सध्या पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र आता श्रीलंका कसोटी मालिका जिंकल्याने दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. श्रीलंकेचे आता ५५.५६ टक्के गूण झाले आहेत.
भारताची स्थिती काय?
भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आतापर्यंत संघाने १० कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी भारत ७ सामने जिंकला आहे. भारताची टक्केवारी ही ७१.६७ टक्के इतकी आहे. बांग्लादेशनंतर भारत मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारत परदेशात जाऊन ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. आगामी काळात दोन बलाढ्य संघांशी भारताला दोन हात करावे लागणार आहे. त्यामुळे भरताच मार्ग खडतर आहे. त्यामुळे जर का बांग्लादेशविरुद्ध दूसरा सामना खेळला गेला तर, भारताला त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.