LSG Vs KKR Playing 11 (फोटो- सोशल मिडिया)
अजिंक्य रहाणे अन् ऋषभ पंत आमने सामने
ईडन गार्डन्सवर 7.30 वाजता सुरू होणार सामना
केकेआरसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा
Tata IPL 2026 LSG Vs KKR Live Updates: आजचा सामना कर्णधार अजिंक्य रहाणेसाठी आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यासाठी महत्वाचा असणार आहे. आज ईडन गार्डन स्टेडियमवर केकेआर विरुद्ध लखनौ यांच्यात सामना रंगणार आहे. आज केकेआरसाठी करो या मरो स्थिती असणार आहे. तर ऋषभ पंत आपल्या संघाला दूसरा सामना जिंकवून देण्यासाठी प्रयत्न करेल. आज दोन्ही संघाची प्लेइंग 11 काय असेल ते जाणून घेऊयात.
आजचा सामना केकेआरच्या होम ग्राऊंडवर होणार आहे. केकेआरला अजूनही आपल्या विजयाचे खाते उघडता आलेले नाही. केकेआरचा संघ आपल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. मागचा पंजाब किंग्जविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना एक गुण मिळाला आहे. मात्र मैदानात अजून त्यांना विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे केकेआरला आजचा सामना जिकणे आवश्यक असणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर लखनौ संघाकडून खेळताना दिसणार का हे पहावे लागणार आहे.
काय आहे हेड टू हेड रेकॉर्ड?
केकेआर विरुद्ध एलएसजी यांच्यात हेड टू हेड रेकॉर्ड पाहायला गेले तर दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले आहेत. या 6 सामन्यात लखनौचे पारडे वरचढ ठरले आहे. एलएसजीने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर केकेआर केवळ 2 सामने जिंकला आहे. मागील वर्षी दोघांमध्ये एकच सामना खेळवला गेला होता. तो सामना एलएसजीने जिंकला होता.
KKR Vs LSG Pitch Report: ईडन गार्डन्सवर पावसाचा अंदाज? काय आहे पीच रिपोर्ट? टॉस जिंकल्यास…
काय आहे आजचा पीच रिपोर्ट?
ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी मदतशीर आहे. सुरुवातीला काही ओव्हर्समध्ये गोलंदाजांना येथे मदत मिळते. मात्र त्यानंतर या ठिकाणी फलंदाजांचेच राज्य चालते. मात्र मागचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आजच्या सामन्यावर देखील पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या खेळपट्टीवर टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण या ठिकाणी लाइट्समध्ये चेस करणे सोपे असल्याचे म्हटले जाते.
कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजा किंग्ज हा सामना ईडन गार्डन्सवर होणार होता. मात्र सामना सुरू झाल्यावर पाऊस सुरू झाल्याने सामना थांबवला गेला. मात्र शेवटी हा सामना रद्द केला गेला. आजच्या सामन्यावर देखील पावसाचे सावट असल्याने आजचा सामना होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
GT जिंकली पण Shubman Gill ला ‘ही’ चूक पडली महागात; बीसीसीआयने घेतली गंभीर दखल
केकेआरची संभाव्य टीम: फिन ॲलन, अजिंक्य रहाणे, कॅमेरून ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, नवदीप सैनी, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझाराबानी, सुनील नरेन , वरुण चक्रवर्ती
एलएसजीची संभाव्य टीम: मिचेल मार्श, एडन मार्करम, ऋषभ पंत, निकोलस पूरन, आयुष बडोनी, अब्दुल समद, दिग्वेश राठी, मोहम्मद शमी, आवेश खान, एम सिद्धार्थ, मुकुल चौधरी, प्रिन्स यादव, शाहबाज अहमद






