फोटो सौजन्य - BCCI
हार्दिक पांड्या : भारताचा उपकर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची जेव्हा निवड झाली तेव्हा त्याच्यावर अनेकांनी टीका करायला सुरुवात केली, कारण म्हणजेच आयपीएल 2024. आयपीएल 2024 मध्ये सर्वात मोठा बदल झाला तो म्हणजेच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून हार्दिक पांड्याला कर्णधार पद देण्यात आले. या घटनेवरून चाहत्यांमध्ये वाद झाले त्याचबरोबर सूत्रांच्या माहितीनुसार खेळाडूंमध्ये रुसवा फुगव सुरु होती. या घटनेवरून देशांमध्ये हार्दिक पंड्यावर जबरदस्त टीका करण्यात आली. त्याचबरोबर त्याला अनेक बोलणी खावी लागली, फक्त चाहत्यांचीच नाही तर दिग्गजांची सुद्धा. एवढेच नव्हे तर हार्दिक पांड्याच्या फलंदाजीवर आणि गोलंदाजीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात होते. जेव्हा हार्दिक पांड्याला वर्ल्ड कपमध्ये स्थान देण्यात आले तेव्हा त्यावर प्रश्न उपस्थित केले कारण त्याची आयपीएलची कामगिरी ही खराब होती.
आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पंड्याच्या कर्णधार पदावर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. कारण मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2024 मध्ये तळालाच राहिला. परंतु एक महिन्यानंतर लगेचच विश्व चषकाला सुरुवात झाली आणि हे चित्र पूर्णपणे बदलले. त्यानंतर चाहत्यांची त्याचबरोबर दिग्गजांची सर्वांच्याच मनांमध्ये हार्दिक पांड्याने असे स्थान निर्माण केले हे स्थान कधीच भारतीय चाहते विसरू शकणार नाहीत. या विश्वचषकातील अंतिम सामन्याच्या अंतिम षटकांमध्ये हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली आणि या गोलंदाजीच्या वेळी त्याने दोन विकेट्स मिळवून भारताच्या संघाला विश्वविजेता केले त्यानंतर त्याचा हा आनंद सर्वांनीच अश्रूमध्ये पाहिला.
यावेळी हार्दिक म्हणाला की, माझ्यासाठी हे मागील सहा महिने फार कठीण होते. मला त्यावेळी रडायला येत होते पण मी रडलो नाही कारण मला लोकांना दाखवायचं नव्हतं. जे लोक माझ्या कठीण काळामध्ये खुश होत होते मला त्यांना अजून खुश करायचे नव्हते आणि मी पुढेही नाही करणार. परंतु आज जे सहा महिने गेले पण देवाची कृपा होती आणि मला चान्ससुद्धा कसा मिळाला शेवटचे षटक टाकण्यासाठी जिथे मी कधी इमॅजिन सुद्धा केले नव्हते. माझ्याकडे शब्द नाहीयेत बोलायला.
Nothing but massive respect for you, @HardikPandya7! 🫡👍🏻
After his recent setbacks, ‘Kung fu Pandya’ narrates how his unwavering spirit, hard work & belief led to his comeback in the #T20WorldCup! 🔥
Tune in to watch the entire celebrations, all day long, TODAY, only on Star… pic.twitter.com/lwxAowAD1A
— Star Sports (@StarSportsIndia) June 29, 2024
सामना जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याच्या डोळ्यात अश्रू नाही तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली त्याचबरोबर अनेक भारतीय संघातील खेळाडूंच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळाले. कारण भारताच्या संघाने 13 वर्षानंतर विश्व विजेता बनला आहे. यामध्ये भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत भारताच्या या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सर्वांचे चाहते सोशल मीडियावर भरभरून कौतुक करत आहेत.