आयपीएलचे लीग स्टेजचे (IPL 2022) सर्व सामने महाराष्ट्रातील चार स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत. मुंबई शिवाय पुण्यातील एका स्टेडियममध्ये लीग स्टेजचे सामने खेळवले जात आहेत. मुंबईच्या वानखेडे, ब्रेबॉर्न, डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये सामने खेळले जात आहेत. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवरही सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच आयपीएलचे प्लेऑफचे (IPL playoff) सामन्यांच्या ठिकाणाबद्दल बीसीसीआयने काहीही सांगितलेलं नाही. मात्र, बीसीसीआय (BCCI) अहमदाबाद आणि लखनौ या दोन शहरांमध्ये प्लेऑफचे सामने आयोजित करण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे.
[read_also content=”भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी कोर्टाकडून मंदाकिनी खडसेंना १९ एप्रिलपर्यंत दिलासा कायम, चौकशीसाठी १५ वेळा हजर राहिल्याची माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/court-give-relief-to-mandakini-khadse-in-bhosari-land-scam-case-nrsr-264250.html”]
क्वालिफायर आणि एलिमिनेटरचा पहिला सामना लखनौमध्ये खेळवला जाईल. एलिमिनेटरचा दुसरा सामना आणि फायनल मॅच अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. “काही दिवसांपूर्वीच आम्ही या मुद्यावर चर्चा केली आहे. काही अधिकारी एकसारखाच विचार करतात. काही दिवसात आमची बैठक होईल. सगळं काही व्यवस्थित राहिलं, तर लखनौ आणि अहमदाबादमध्ये प्लेऑफचे सामने होतील” असं सूत्रांनी सांगितलं.
आयपीएल २०२२ चं आयोजन यंदाही बायोबबलमध्ये केलं जात आहे. दोन वर्षानंतर यंदाचा सीजन पूर्णपणे भारतात होत आहे. २०२० मध्ये कोविडमुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजन करण्यात आले होते. भारतात ही लीग २०२१ च्या सुरुवातीला आयोजित करण्यात आली होती. पण मध्येच बायोबलमध्ये कोरोनाने घुसखोरी केली. त्यामुळे स्पर्धा मध्येच स्थगित करण्यात आली. यूएईमध्ये आयपीएलचे आयोजन करावे लागले.