KKR vs PBKS LIve Streaming (फोटो- सोशल मिडिया)
आज केकेआरविरुद्ध पंजाब किंग्ज भिडणार
केकेआर पहिल्या विजयासाठी प्रतीक्षेत
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना
PBKS Vs KKR IPL 2026 Live Updates: आज ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (KKR Vs PBKS) यांच्यात सामना होणार आहे. केकेआरचा संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयात प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आज केकेआरसाठी करो या मरो अशी स्थिती असणार आहे. आजच्या सामन्यात पावसाची शक्यता आहे. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. केकेआरने आपले पहिले दोन सामने गमावले आहेत. पहिला सामना मुंबई इंडियन्सकडून तर दूसरा सामना सनरायझर्स हैदराबादकडून केकेआर हरला आहे. त्यामुळे विजयाचे खाते उघडण्यासाठी केकेआर उत्सुक असणार आहे. तर पंजाब किंग्जचा संघ सलग तिसरा विजय प्राप्त करून पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी प्रयत्न करेल.
खेळपट्टीचा अहवाल काय सांगतो?
खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास, ईडन गार्डन्सची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. वेगवान आउटफिल्डमुळे धावा करणे सोपे होते. खेळपट्टी सपाट आहे आणि चेंडू चांगला उसळतो, ज्यामुळे फलंदाजांना मुक्तपणे खेळता येते. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना काही प्रमाणात मदत मिळू शकते, परंतु जसजसा खेळ पुढे सरकतो, तसतशी खेळपट्टी संथ होते आणि फिरकी गोलंदाज प्रभाव पाडू लागतात. लहान सीमा आणि दव यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणे अनेकदा सोपे जाते.
CSK चा वनवास संपणार? MS Dhoni ‘या’ टीमविरुद्ध मैदानात उतरणार; समोर आली मोठी बातमी
हवामान विभागाच्या मते, हवामानाचा केकेआर-पीबीकेएस सामन्यावर परिणाम होऊ शकतो. दिवसभर शहरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, पावसाची शक्यता आहे. पावसासोबतच, जोरदार वारे आणि मेघगर्जनेमुळेही सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. सायंकाळी ७:०० ते ८:०० दरम्यान पावसाची ४० टक्के शक्यता आहे, जी पुढील तासात ५० टक्क्यांपर्यंत वाढेल आणि रात्री हळूहळू कमी होईल. अशा परिस्थितीत, सामना कमी वेळेत संपण्याची शक्यता वाढते.
सामन्यासाठी दोन्ही संघांसाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन
कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, आंग्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, आरके सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, वैभव अरोरा, नवदीप सैनी, कार्तिक त्यागी, आशीर्वाद मुजारबानी.
RCB च्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये खळबळ; कोण कोणत्या स्थानी? एकदा वाचाच…
पंजाब किंग्ज : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कूपर कोनोली, एस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, एमपी स्टॉइनिस, एम जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, युझवेंद्र चहल.






