भारत आयर्लंडविरुद्ध खेळणार (फोटो- ai gemini)
जूनमध्ये टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर
आयर्लंडविरुद्ध खेळणार टी-20 स्पर्धा
त्यानंतर इंग्लंडविरुद्ध खेळणार टीम इंडिया
Cricket News: भारतीय संघाने नुकताच इंटरनॅशनल टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली आहे. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा दारूण पराभव केला होता. टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघ टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा संघ लवकरच आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.
भारतीय संघ जून महिन्यात आयर्लंडमध्ये टी-20 स्पर्धा खेळण्यास जाणार आहे. तिथे भारतीय संघ टी-20 सिरिज खेळणार आहे. भारताच्या दौऱ्याबाबत आयर्लंडने भाष्य केले आहे. भारत इंग्लंड दौऱ्याआधी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. आयर्लंडविरुद्ध खेळल्यानंतर भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे.
आयर्लंड दौऱ्यानंतर भारताचा संघ 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. यावेळी भारत इंग्लंडविरुद्ध 5 टी-20 सामने आणि 3 वनडे सामने खेळणार आहे. त्याच्या आधी भारत अफघणिस्तान विरुद्ध एक कसोटी सामना आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. हा दौरा 20 जूनला संपणार आहे.
Rajasthan Royals ला मोठा धक्का, दुखापतीमुळे हा स्टार अष्टपैलू खेळाडू IPL 2026 मधून बाहेर
भारत विरुद्ध आयर्लंडचा इतिहास
भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात गेले काही अवर्षांमध्ये अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. 2018, 2022, 2023 मध्ये भारताने आयर्लंडचा दौरा केला होता. यंदा आयर्लंड आपल्या नवीन कर्णधारासह खेळणार आहे. त्यामुळे जूनमध्ये होणाऱ्या सामन्यात अधिक रंगत येण्याची शक्यता आहे.
Rajasthan Royals ला मोठा धक्का
आयपीएल २०२६ सुरू होण्यास काहीच दिवस उरले असताना, अनेक संघांच्या खेळाडूंनी सराव देखील सुरू केला आहे. परदेशामधील देखील खेळाडू भारतामध्ये पोहोचले आहेत. सॅम करनने विश्वचषकामध्ये कमालीची कामगिरी केली होती. त्याने विश्वचषकामध्ये इंग्लंडसाठी फक्त गोलंदाजीमध्येच नाही तर फलंदाजीमध्ये देखील जोर दाखवला होता. राजस्थान रॉयल्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. त्यांचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन मांडीच्या संभाव्य दुखापतीमुळे या हंगामात आपल्या नवीन फ्रँचायझीकडून खेळू शकणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, राजस्थान रॉयल्सने यावर्षी संजू सॅमसनच्या बदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना सीएसकेकडे ट्रेड केले होते. करन शेवटचा ५ मार्च रोजी भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यात क्रिकेटच्या मैदानावर दिसला होता, ज्यात त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.






