फोटो सौजन्य - सोशल मिडिया
IPL 2026 : आयपीएल सुरू होण्याआधी खेळाडूंचे दुखापतीचे सत्र देखील सुरूच आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने खेळाडूंच्या अनेक बातम्या दुखापतीसंदर्भात समोर येत आहेत. अनेक खेळाडू हे सुरूवातीचे आयपीएल 2026 चे सामने मुकणार आहेत असा अनेक वृतांचा दावा आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच पंजाब किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू लॉकी फर्ग्युसनने स्पर्धेतील पहिल्या सात सामन्यांमधून माघार घेतली आहे. फर्ग्युसन नुकताच वडील झाला असून त्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे, ज्यामुळे त्याला काही सामने चुकवावे लागतील.
हॅरी ब्रुकप्रमाणे त्याच्यावरही आयपीएलमधून बंदी घातली जाईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लिलावात विकला गेल्यानंतर ब्रुकनेही स्पर्धेतून माघार घेतली होती, ज्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. आयपीएलचे नियम पाहता, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनवर बंदी घातली जाणार नाही. प्रस्थापित नियमांनुसार, जर एखाद्या खेळाडूने लिलावासाठी नोंदणी केली आणि नंतर माघार घेतली, तर त्याच्यावर दोन हंगामांसाठी बंदी घातली जाते.
या बंदीअंतर्गत, तो खेळाडू आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही किंवा लिलावासाठी नोंदणीही करू शकणार नाही. फर्ग्युसनने स्वतःची नोंदणी केली आणि पंजाब किंग्सने त्याला २ कोटी रुपयांना विकत घेतले, परंतु तो फक्त सुरुवातीच्या काही सामन्यांसाठीच उपलब्ध आहे. ही रजा वैयक्तिक कारणांसाठी आणि नियोजित मानली जाईल. या कारणास्तव त्याच्यावर बंदी घातली जाणार नाही.
IPL 2026 : भुवनेश्वर कुमारच्या अचूक यॉर्करने विराट कोहली थोडक्यात बचावला; सोशल मिडियावर Video Viral
इंग्लंडचा स्टार खेळाडू हॅरी ब्रुकने आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव होण्यापूर्वीच त्यासाठी नोंदणी केली होती. दिल्ली कॅपिटल्सने त्याला ६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर त्याने वैयक्तिक कारणांचा हवाला देत स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच माघार घेतली. आता त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे, ज्यामुळे तो या हंगामाच्या लिलावात सहभागी होऊ शकणार नाही.
Big Blow for Punjab Kings 🚨
Lockie Ferguson likely to miss the early stage of IPL 2026 as is prioritizing to spend time with new born baby#Lockieferguson #PunjanKings #IPL2026 pic.twitter.com/ETPQF99hO1 — Cricket Guru (@CricketGuru_CG) March 20, 2026
संघ: प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर, शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला उमरझाई, मार्को यान्सन, यश ठाकुर, विष्णु विनोद, कूपर कोनोली, बेन ड्वार्शियस, प्रवीण दुबे, हरप्रीत ब्रार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुशीर खान, प्याला अविनाश, हरनूर पन्नू, सूर्यांश शेडगे, मिशेल ओवेन, जेवियर बार्टलेट, लॉकी फर्ग्यूसन, वैशाक विजयकुमार, विशाल निषाद.






