
70-year-old Indian cricketer's 28-year-old wife; Will give a special surprise to her groom on his birthday; Read in detail..
अरुण लाल यांची पत्नी बुलबुलने सांगितल्यानुसार, अरुण लाल यांचा ३१ जुलै रोजी खरा वाढदिवसया असतो. पण, कागदपत्रांवर १ ऑगस्ट अशी तारीख लिहिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी दोन वेळा त्यांचा वाढदिवस साजरा केला जात असतो. एक खासगी पद्धतीने, तर दुसरा सार्वजनिक पद्धतीने साजरा केला जातो. यंदाच्या वर्षाचा वाढदिवस हा खूप खास असणार आहे.असे देखील बुलबुलने सांगितले आहे.
हेही वाचा : Yuzvendra Chahal Podcast : का झाला युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट? युझीने स्वत: केलं स्पष्ट
तीन वर्षांपूर्वी माजी क्रिकेकटपटू अरुण लाल यांनी बुलबुलसोबत लग्न केलं होतं. या लग्नानंतर अनेकांकडून त्यान्ह्यकवर या नात्याला घेऊन टीका देखील केली होती. अनेकांनी असे देखील म्हटले होते की,’दोघांचं नातं फार काळ टिकू शकणार नाही’, पण दिवस जात राहिले आणि त्यांच्या नात्यात अधिक घट्ट बंध निर्माण झाले. आज दोघे देखील एकमेकांसोबत आनंदी आयुष्य जगत असल्याचे दिसून येत आहेत.अशातच अरुण लाल आता त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा करत आहेत.
अरुण लाल यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांची पार्टी देखील खास होणार आहे. जवळपास ५० लोकांना वाढदिवसासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याबाबत बोलताना बुलबुल म्हणाली की, ‘शुक्रवारी एका कॅटरिंग कंपनीकडे जबाबदारी सोपावण्यात आली असून काही जवळच्या व्यक्तींना देखील बोलवण्यात आलं आहे. मित्र आणि वकील परितोष सिन्हा तसेच माजी क्रिकेटपटू आणि खासदार कीर्ती आझाद हे देखील या दिवशी उपस्थित असणार आहेत. हा दिवस जवळच्या मित्रांसोबत साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे ५० लोकांना बोलावण्यात आले आहे.‘
हेही वाचा : India vs England 5th Test : इंग्लडचा स्टार 5 व्या कसोटीतून बाहेर होणार का? सहकारी खेळाडूने दिली वाईट बातमी
अरुण लाल यांच्या वाढदिवसासाठी बुलबुलकडून एक खास सरप्राईज देखील तयार ठेवले आहे. अरुण हे जपानला जाणार होते. परंतु, त्यांच्या व्यस्त वेळापत्रक आणि असणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे जायला जमले नाही. आता बुलबुलने त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय एकला आहे. ते दोघेही नोव्हेंबरमध्ये जपानला फिरायला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
भारतासाठी डावाची सुरुवात करणारे माजी क्रिकेटपटू अरुण लाल यांनी दुसरे लग्न केले आहे. त्यांचा त्यांच्या पहिल्या पत्नी रीनासोबत घटस्फोट झाला आहे. रीनाची तब्येत नित्रहत नव्हती, त्यामुळे अरुण लाल यांनी तिच्या संमतीनंतरच दुसरे लग्न केलं आहे.