फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : भारताने यंदा पॅरिस ऑलिम्पिक ६ पदकांची कमाई केली होती, त्यामुळे भारतीय प्रेक्षक नाराज होते. त्यानंतर पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये ज्याप्रकारे भारताच्या पॅरा खेळाडूंनी कामगिरी केली आहे. त्याच्या या कमालीच्या कामगिरी भारतीय चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. भारताने मागील १० दिवसांमध्ये २९ पदकांची कमाई केली आहे. ७ सुवर्णपदक, ९ रौम्य पदक आणि १३ कास्यपदकांचा समावेश आहे. आज पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चा शेवटचा दिवस असणार आहे. आज पॅरिस पॅरालिम्पिकचा समारोप समारंभ पार पडणार आहे. हा समारोप समारंभ भारतीय वेळेनुसार रात्री ११.३० मिनिटांनी सुरु होणार आहे.
भारताने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये २९ मेडलची कमाई केली आहे. यामध्ये भारताने ७ सुवर्णपदक, ९ रौम्य पदक आणि १३ कांस्यपदक खात्यात जमा केले आहेत. या ७ सुवर्णपदकांसह भारत सध्या सोळाव्या स्थानावर आहे.