फोटो सौजन्य - ICC
दक्षिण आफ्रिका : २४ जून रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामना रंगला होता. या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने DLS नियमानुसार हा सामना जिंकला आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वेस्ट इंडिजला ३ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यामध्ये दोन खेळाडूंमध्ये टक्कर लागून अपघात झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचे कगिसो रबाडा आणि मार्को जॅनसेन हे दोघे बाउंड्रीला झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना दोघेही एकमेकांना आदळले. दोघांनाही तोच झेल घेता आला नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर काही काळ सामना रोखण्यात आला आहे.
आयसीसीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे रबाडा आणि मार्को जॅनसेन हे झेल घेताना आदळले आहेत. या घटनेत कोणत्याही खेळाडूला गंभीर दुखापत झालेली नाही. वेस्ट इंडिजच्या डावातील हे ८ वे षटक होते, ज्यामध्ये एडन मार्कराम गोलंदाजीसाठी आला होता. षटकाच्या पाचव्या चेंडूवर, काइल मेयर्सने मार्करामचा चेंडू लाँग ऑफच्या दिशेने खेळला, जिथे मार्को जॉन्सन तैनात होता, तर रबाडाही लाँग ऑनवर उपस्थित होता. काइल मेयर्सचा झेल घेण्यासाठी दोन्ही खेळाडू चेंडूच्या दिशेने धावले आणि एकमेकांना आदळले त्यामुळे दोन्ही खेळाडू तो झेल घेऊन शकले नाही.
हे दोन्ही खेळाडू आदळल्या नंतर दोघांच्या टक्करदरम्यान चेंडू विखुरला आणि सीमारेषेच्या बाहेर पडला. रबाडाने जॉन्सनच्या छातीला आणि पोटाला मारले आणि दोन्ही मांडी आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. दोघेही वेदनेने ओरडताना दिसले. फिजिओ टीम मैदानात आल्याने सामना काही काळ थांबवावा लागला.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवला. ग्रुप दोन मध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि अमेरिकेचा संघ आहे. यामध्ये साऊथ आफ्रिकेच्या संघाने सुपर-८ चे तिन्ही सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडच्या संघाने तीन सामन्यांपैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजचे तीनही सुपर-८ मधील सामना झाले आहेत त्यामधील त्यांनी फक्त १ सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे ते उपांत्य फेरीतून बाहेर झाले आहेत.