
Vaibhav Suryavanshi's performance in the Syed Mushtaq Ali Trophy was a huge success! He scored a century and achieved 'this' feat.
Vaibhav Suryavanshi created history : वैभव सूर्यवंशी आपल्या कामगिरीच्या जोरावर चांगलाच चर्चेत येत असतो. अशातच त्याने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने सर्वांना भुरळ घातली आहे.दरम्यान बीसीसीआयने आयोजित केलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील पहिले शतक ठोकून मोठी कामगिरी केली आहे. महाराष्ट्राविरुद्ध, वैभवने ५८ चेंडूत शतक पूर्ण केले आहे. त्याने षटकार ठोकून आपले शतक पूर्ण केले आहे.
वैभव सूर्यवंशीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू बनला आहे. १४ वर्षे २५० दिवसांच्या वयात, वैभव सूर्यवंशीने ७ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. त्याने अर्शिन कुलकर्णीच्या चेंडूवर षटकार मारून हा पराक्रम केला आहे.
हेही वाचा : ग्लेन मॅक्सवेल IPL 2026 मध्ये दिसणार नाही, केला अलविदा! चाहत्यांचे मानले आभार; लिहिला भावनिक संदेश
वैभवची नाबाद शतकी खेळी…
वैभव सूर्यवंशीने महाराष्ट्राविरुद्ध ६० चेंडूत नाबाद १०८ धावा फटकावल्या आहेत. वैभवच्या शतकाच्या जोरावर बिहारने २० षटकांत ३ गडी गमावून १७६ धावा उभ्या केल्या. वैभव सूर्यवंशीने आयुष लोहारुकासोबत चौथ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचली. आयुष लोहारुका १७ चेंडूत २५ धावा काढून नाबाद राहिला. १२ डिसेंबरपासून दुबई येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये वैभव सूर्यवंशी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वैभव सूर्यवंशीचा फॉर्म चिंतेचा विषय बनला होता, परंतु त्याच्या शतकामुळे तो फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे.
पहिल्या तीन सामन्यांमध्ये अपयशाचा सामना
वैभव सूर्यवंशी हा सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये बिहार संघाचा उपकर्णधार आहे. वैभवला पहिल्या तीन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. या सामन्यापूर्वी, कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या एलिट ग्रुप बी सामन्यात त्याने एकूण ३२ धावा करून माघारी गेला होता. २६ नोव्हेंबर रोजी चंदीगडविरुद्धच्या सामन्यात वैभव फक्त १४ धावांवरच बाद झाला होता. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशविरुद्ध तो फक्त १३ धावांच करू शकला होता. ३० नोव्हेंबर रोजी जम्मू आणि काश्मीरविरुद्ध वैभव फक्त ५ धावांवर बाद झाला. त्यामुळे त्याचा फॉर्म चिंतेचा विषय बनला होता.
हेही वाचा : AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, संघातील महत्वाचा फलंदाज गाब्बा कसोटीतून बाहेर! वाचा सविस्तर
१४ व्या वर्षीच शतकांची आतिषबाजी
वैभव सूर्यवंशीने प्रत्येक शतकासह अनेक विक्रम रचले आहेत. प्रथम, त्याने आयपीएलमध्ये शतक झळकावून अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. त्यानंतर, त्याने अलिकडच्या आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये १४४ धावांच्या खेळीने इतिहास रचला आहे. आता, तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू देखील बनला आहे.