ब्राँझ सिरीज टेनिस (फोटो- सोशल मिडिया)
उंड्री येथील एलीन स्पोर्ट्स टेनिस अकादमी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत ८ वर्षाखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित वेदांश डिक्कर याने साईश देसाईचा ७-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. याच मुलींच्या गटात बिगर मानांकित रावी पाटील हिने अव्वल मानांकित रियाना जॉर्जचा ७-४ असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
१० वर्षाखालील मुलांच्या गटात तिसऱ्या मानांकित शौर्य कलवागट्टू याने चौथ्या मानांकित अयांश आखाडे चा ७-५ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अव्वल मानांकित इरा जोशी हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दुसऱ्या मानांकित अनायशा चाफळकरचा ७-५ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्नुकरचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सचा तिसरा, तर बदामीकर स्टार्सचा दुसरा शानदार विजय
विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रे
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक प्रशस्तीपत्र अशी पारितोषिक देण्यात आली स्पर्धेचे पारितोषिक वितरण एलीन स्पोर्ट्स टेनिस अकादमीचे सह संस्थापक अमेय शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमडीटीए सुपरवायझर तेजल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल : ८ वर्षाखालील मुले : उपांत्य फेरी :
वेदांश डिक्कर (१) वि. वि. शर्विल ठाकरे (३) ६-२;
साईश देसाई वि. वि. ईशान शर्मा ६-०;
अंतिम फेरी : वेदांश डिक्कर (१) वि. वि. साईश देसाई ७-३;
८ वर्षाखालील मुली : उपांत्य फेरी :
रियाना जॉर्ज (१) वि. वि. ध्रुविका भाळसिंग ६-२;
रावी पाटील वि. वि. राधा देशपांडे (३) ६-४;
अंतिम फेरी : रावी पाटील वि. वि. रियाना जॉर्ज (१) ७-४;
१० वर्षाखालील मुले : उपांत्य फेरी :
अयांश आखाडे (४) वि. वि. शौर्य कदम ६-३;
शौर्य कलवागट्टू (3) वि. वि. कबीर बाहेती ६-३;
अंतिम फेरी : शौर्य कलवागट्टू (३) वि. वि. अयांश आखाडे (४) ७-५
Sports News: पुण्यात स्नूकर लीगचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सची विजयी सलामी; साखळी फेरीत थेट..
१० वर्षाखालील मुली : उपांत्य फेरी :
इरा जोशी (१) वि. वि. याशवी मल्होत्रा (३) ६-२;
अनायशा चाफळकर (२) वि. वि. विदिशा मुंडे (४) ६-५ (४);
अंतिम फेरी : इरा जोशी (१) वि. वि. अनायशा चाफळकर (२) ७-५.






