पीवायसी स्नुकर अँड बिलियर्डस लीग स्पर्धा
पुण्यनगरीत स्नुकर अँड बिलियर्डस लीग स्पर्धेचे आयोजन
स्कायलाईन स्ट्रायकर्स संघाने टीपी रॉकेट्स संघावर मिळवला विजय
बदामीकर स्टार्स संघाने क्यु मास्टर्स संघाचा केला ४-३ असा संघर्षपूर्ण पराभव
पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित तिसऱ्या पीवायसी स्नुकर अँड बिलियर्डस लीग स्पर्धेत साखळी फेरीत स्कायलाईन स्ट्रायकर्स संघाने तिसऱ्या, तर बदामीकर स्टार्स संघाने दुसऱ्या विजयाची नोंद केली. पीवायसी जिमखाना येथील स्नुकर अँड बिलियर्डसमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत बदामीकर स्टार्स संघाने क्यु मास्टर्स संघाचा ४-३ असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसरा विजय मिळवला. विजयी संघाकडून राजवर्धन जोशी, शक्ती चितळे, गुरु चिल्लाल, ईशान भाले, मिहीर शहा यांनी अफलातून कामगिरी केली.
दुसऱ्या लढतीत आदित्य देशपांडे, अमित भडभडे, आनंद आपटे, देवव्रत राक्षे, विशाल भुरट, अनिकेत शिंदे, आरिन माळी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर स्कायलाईन स्ट्रायकर्स संघाने टीपी रॉकेट्स संघावर ६-१ असा एकतर्फी विजय मिळवला.
निकाल : साखळी फेरी
बदामीकर स्टार्स वि. वि. क्यु मास्टर्स ४-३ (१५ रेड स्नूकर एकेरी : राजवर्धन जोशी वि. वि. निशाद चौघुले ५९-५१; ६ रेड दुहेरी : शक्ती चितळे / गुरु चिल्लाल वि. वि. आमिर आजगावकर / आदित्य पावनगडकर ६५-२२; बिलियर्ड्स : राजवीर राजाध्यक्ष पराभूत वि. गिरीश दामले ६१-१०१; ६ रेड स्नूकर एकेरी : ईशान भाले वि. वि. योगेश लोहिया ४१-२०; ६ रेड स्नूकर दुहेरी : सिद्धार्थ बदामीकर / सत्यजीत लिमये पराभूत वि. दिपक सबनीस / राहुल मुंदडा ४१-५३; ब्लॅक बॉल शूटआऊट : यश शहा पराभूत वि. सौमित्र रानडे १-३; ब्लु बॉल शूटआऊट : मिहीर शहा वि. वि. क्षितिज लोहिया १-०)
Sports News: पुण्यात स्नूकर लीगचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सची विजयी सलामी; साखळी फेरीत थेट..
स्कायलाईन स्ट्रायकर्स वि. वि. टीपी रॉकेट्स ६-१ (१५ रेड स्नूकर एकेरी : आदित्य देशपांडे वि. वि. प्रशांत कुलकर्णी ८७-५९; ६ रेड स्नूकर दुहेरी : दिव्यांश गोरे / संजीव आगाशे पराभूत वि. तुषार मेंगाळे / केदार लुकतुके ३९-५३; बिलियर्ड्स : अमित भडभडे वि. वि. रणजीत पांडे १०१-८२; ६ रेड स्नूकर एकेरी : आनंद आपटे वि. वि. रोहित नारगोळकर ५०-१२; ६ रेड स्नूकर दुहेरी : देवव्रत राक्षे / विशाल भुरट वि. वि. मेघ तायडे / संजय बामणे ७३-३६; ब्लॅक बॉल शूटआऊट : अनिकेत शिंदे वि. वि. समीर सावला ३-२; ब्लु बॉल शूटआऊट : आरिन माळी वि. वि. उदयन भागवत २-१)
Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!
६ रेड स्नूकर एकेरीत संजीव आगाशे यांना गिरीश दामले यांच्याकडून २५-४७ असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र, ६ रेड स्नूकर दुहेरीत अमित भडभडे आणि विशाल भुरट यांनी दीपक सबनीस व राहुल मुंदडा यांचा ५४-४४ असा पराभव केला. ब्लॅक बॉल शूटआऊटमध्ये आनंद आपटेने सौमित्र रानडेवर ३-१ अशी मात केली.






