नवी दिल्ली- आशियाई खेळ आणि कॉमनवेल्थ खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकलेल्या विनेश फोगाटने शनिवारी तिचे अर्जुन आणि खेल रत्न पुरस्कार कर्तव्य पथावर ठेवले.
विनेश फोगाटने परत केला अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार
शनिवारी कुस्तीगीर विनेश फोगाटने अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार परत केला. ती पंतप्रधानांना भेटून पुरस्कार परत करणार होती. पण, पोलिसांनी फोगाटला पंतप्रधान कार्यालयापर्यंत जाऊ दिलं नाही. त्यामुळे ती कर्तव्य पथावर पुरस्कार ठेवून परत गेली. ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनियाने यासंदर्भात एक्सवर व्हिडिओ शेअर केला आहे.
यह दिन किसी खिलाड़ी के जीवन में न आए। देश की महिला पहलवान सबसे बुरे दौर से गुज़र रही हैं। #vineshphogat pic.twitter.com/bT3pQngUuI
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) December 30, 2023
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विनेश फोगाट पुरस्कार घेऊन चालत आहे. पुनियाने व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, असा दिवस कोणत्याही खेळाडूच्या जीवनामध्ये येऊ नये. आज देशातील कुस्तीगीर महिला सगळ्यात वाईट कालखंडातून जात आहेत.
पंतप्रधान मोदी यांना लिहिलं होतं पत्र
आशियाई खेळात सुवर्ण पदकाची कमाई केलीली कुस्तीपटू विनेश फोगाटने मंगळवारी आपण खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत असल्याचं जाहीर केलं होतं. तिने पंतप्रधान मोदी यांना यासंदर्भात पत्र लिहिलं होतं. कुस्तीगीर न्याय मिळण्यासाठी संघर्ष करत असताना पुरस्कार जवळ ठेवणे योग्य ठरणार नाही. आपले जीवन सरकारच्या जाहीरातीप्रमाणे नाही जे महिला सशक्तीकरणच्या गोष्टी करत असतं, असं ती मत्रात म्हणाली होती.
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप
महिला कुस्तीगिरांनी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. कुस्ती महासंघात ब्रिजभूषण सिंग यांच्या गटाचा विजय झाल्याने कुस्तीगीर साक्षी मलिक हिने खेळातून संज्ञास घेण्याची घोषणा केली होती. तसेच कुस्तीगीर बजरंग पुनिया याने आपला पुरस्कार परत केला होता. त्यानंतर सरकारने नव्या कुस्ती महासंघाची कार्यकारिणी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई होईपर्यंत कुस्तीगिरांनी आक्रमक राहण्याचा पवित्रा घेतला आहे.