कोण आहे प्रफुल हिंगे, पदार्पणातच रचला इतिहास (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सनरायझर्स हैदराबादकडून IPL 2026 मध्ये पदार्पण करणाऱ्या २४ वर्षीय वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगेने आपल्या पहिल्याच षटकात राजस्थान रॉयल्सला गुडघे टेकायला लावले. प्रफुल्लच्या भेदक गोलंदाजीने सर्वप्रथम वैभव सूर्यवंशीला बाद केले. राजस्थान सावरण्यापूर्वीच प्रफुल्लने ध्रुव जुरेललाही बाद केले. आपल्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रफुल्लने ड्वेन प्रिटोरियसला बाद करून इतिहास रचला.
प्रफुल्लने रचला इतिहास
प्रफुल्ल आयपीएलच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकात तीन बळी घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. प्रफुल्लने आपल्या पहिल्या षटकात बाद केलेले तिन्ही फलंदाज आपले खाते उघडण्यात अपयशी ठरले. वैभव सूर्यवंशीचा पहिलाच बळी घेत प्रफुल्लने आपल्या नावाची चर्चा करायला सर्वांनाच भाग पाडले आहे. विदर्भातील हा मराठमोळा खेळाडू पहिल्याच मॅचमध्ये प्रचंड प्रसिद्ध झालाय. चला तर मग जाणून घेऊया, सनरायझर्सचा हा भेदक पदार्पण करणारा खेळाडू कोण आहे.
SRH Vs RR: हैदराबादमध्ये Ishan Kishan ची रॉयल ‘धुलाई’; राजस्थानला 5 व्या विजयासाठी 217 रन्सची गरज
२४ वर्षीय वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगे कोण आहे?
२४ वर्षीय प्रफुल्ल हिंगे देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळतो. प्रफुल्लने २०१४ मध्ये विदर्भकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात प्रफुल्लने आपल्या भेदक गोलंदाजीने खळबळ उडवून दिली. परिणामी, सनरायझर्सच्या स्काउटिंग टीमने त्याला केवळ ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघात घेतले. प्रफुल्ल हिंगेला या हंगामातील पहिल्या चार सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही, परंतु त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात सनरायझर्ससाठी आपली छाप पाडली.
प्रफुल्लच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने विदर्भकडून एकूण १० प्रथम श्रेणी आणि ६ लिस्ट ए सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रफुल्लने विदर्भसाठी एकूण २७ बळी घेतले आहेत, तर ६ लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने ५ बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, आयपीएल पदार्पणापूर्वी प्रफुल्लने फक्त एक टी-२० सामना खेळला होता, ज्यात त्याने २४ धावांत १ बळी घेतला होता.
SRH Vs RR Live: रियान परागने टॉस जिंकला; एसआरएच विरुद्ध घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय






