फोटो सौजन्य - सोनी स्पोर्ट्स नेटवर्क
कोरियामधील ग्वायंजू येथे सध्या जागतिक तिरंदाजी पॅरा चॅम्पियनशिप सुरू आहे. या स्पर्धेचे सध्या फायनल सामने खेळवले जात आहेत. या स्पर्धेमध्ये भारताची युवा शितल देवी हिने महिला कंपाऊंड ओपनच्या अंतिम फेरीमध्ये तुर्कीच्या ओझनुर क्युर गिर्डी हिला पराभूत करून वर्ल्ड चॅम्पियन झाली आहे. सुवर्णपदकाच्या फेरीमध्ये शीतल देवी हिने सुरुवातीपासूनच आघाडी घेत संपूर्ण सामन्यात कमालीची कामगिरी केली. फायनल मध्ये तिने तुर्की विरुद्ध 146–143 असा विजय मिळाला.
भारताची ही युवा खेळाडू शितलदेवी हिने पॅरा ओलंपिकमध्ये तीन वेळा सुवर्णपदक विजेती असलेली तिरंदाज हिला पराभूत करून सुवर्णपदक भारताच्या नावावर केले आहे. 2024 मध्ये झालेल्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेतीला हरवून गोल्ड मेडल जिंकले. शितल देवीचे वर्ल्ड चॅम्पियनशिप पॅरा आर्चरीमध्ये तिसरे मेडल आहे. सांघिक स्पर्धेमध्ये रौम्य आणि कांस्य पदक जिंकल्यानंतर शीतल देवीचे हे आजच्या दिवसातले तिसरे पदक आहे.
A BIG SALUTE TO SHEETAL DEVI 🇮🇳🫡 🏅 Gold in Indivual Compound
🥈 Silver in Women’s Team Compund
🥉 Bronze in Mixed Team Compound 3 Medal for her at World Archery Para C’ship 🏆 pic.twitter.com/8sR9FW68wi — The Khel India (@TheKhelIndia) September 27, 2025
वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये तो मन कुमार सोबत मिश्र संगीत स्पर्धेमध्ये लय कायम ठेवत ग्रेट ब्रिटनच्या जोडीला पराभूत करून कास्यपदक नावावर केले आहे. भारताच्या या जोडीने संयम आणि अचूकता दाखवत सुरुवातीलाच आघाडी घेतली होती आणि ही आघाडी कायम ठेवत ग्रेट ब्रिटनच्या जोडीला १५२–१४९ पराभूत करून ब्राऊन मेडल नावावर केले.
महिला दुहेरी संघामध्ये देखील भारताचा संघाने कमालीची कामगिरी करत रौम्य पदक नावावर केले. महिला संघाच्या अंतिम सामन्यांमध्ये शितलने सरिता सोबत तुर्कीच्या सामन्यात रोमांचक लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. संपूर्ण सामन्यामध्ये सरिताने डेंट सेंटर टेस्टची प्रभावी मालिका दाखवली पण तिचा शेवटचा बाण हात चुकला आणि सात गुणांसह कमी पडला आणि तुर्कीला १५२–१४९ असा विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले त्यामुळे भारताच्या संघाला रौम्य पदकावर समाधान मानावे लागले.
राकेश कुमार विरुद्ध तोमन कुमार यांच्यामध्ये पुरुष एकेरी मध्ये फायनल सामना खेळवण्यात आला. या सामन्यांमध्ये राकेश कुमार यांचे दोनही बाण निशाण्यावर लागले नाहीत. त्याच्या आर्चरी मध्ये काहीतरी बिघाड असल्याचे समजल्यानंतर त्याने माघार घेतली आणि तोमन कुमार हा वर्ल्ड चॅम्पियन ठरला. त्यामुळे राकेश कुमार याला सिल्वर मेडल वर समाधान मानावे लागले. श्याम कुमार सुंदर याला ब्रांच मेडल सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला भारताच्या पहिल्या दोन स्थानावर पुरुष संघाने दमदार कामगिरी करवत सुवर्णपदक आणि रौम्य पदक जिंकले.