Big Breaking: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार! एकाच टीममध्ये पुरुष-महिला खेळणार; Zaheer khan च्या 'Equal' ची घोषणा

Zaheer khan Mixed Gender Equal Cricket League: क्रिकेटच्या विश्वात एक नवीन प्रयोग होणार आहे. पहिल्यांदाच पुरुष आणि महिला क्रिकेटपटू एकाच संघात खेळताना दिसतील. या टी२० लीगला 'इक्वल' असे नाव देण्यात आले आहे.
Photo - Ai Generated
Zaheer khan Mixed Gender Equal Cricket LeagueZaheer khan Mixed Gender Equal Cricket League
Published on: 
Updated on: 
  • T20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक प्रयोग

  • पुरुष-महिला एकाच संघात खेळणार

  • झहीर खानच्या 'Equal' लीगची घोषणा

Mixed Gender Equal Cricket League: क्रिकेटविश्वात पुरुष क्रिकेट टी-२० लीग आणि महिला क्रिकेट टी-२० लीग या स्पर्धा खेळवल्या जातात. परंतु, लवकरच पुरुष आणि महिला क्रिकेटपटू क्रिकेटच्या मैदानावर एकाच संघात खेळताना दिसतील.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या सह-मालकीच्या 'अँकर स्पोर्ट्स एबी' या कंपनीने, जर्मन क्रिकेट फेडरेशनसोबत (Deutscher Cricket Bund) मिळून 'इक्वल' (Equal) नावाच्या मिक्स्ड जेंडर टी२० लीगची घोषणा केली आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी ऑगस्टमध्ये जर्मनीमध्ये आयोजित केली जाईल. या लीगमध्ये एकूण ५ संघ सहभागी होतील. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना एकाच संघात समाविष्ट करून त्यांना एकत्र खेळण्याची संधी देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

मिक्स्ड जेंडर टी२० लीगवर झहीर खान काय म्हणाला?

पीटीआयच्या वृत्तानुसार, अँकर स्पोर्ट्स एबीचे सह-मालक झहीर खानने मिक्स्ड जेंडर टी२० लीगला क्रिकेटच्या विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हटले आहे. झहीर म्हणाला की, 'क्रिकेटमध्ये लोकांना एकत्र आणण्याची शक्ती आहे. विशेषतः युरोपसारख्या नवीन मार्केटमध्ये, क्रिकेटची लोकप्रियता किती आहे, हे किती लोकांपर्यंत जास्तीत जास्त सहजपणे पोहोचवता येईल यावर अवलंबून असेल. 'इक्वल'सारखे उपक्रम या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावतील.'

Photo - Ai Generated
Paras Mhambrey: IPL 2027 आधी पंजाब किंग्सचा मोठा डाव! हार्दिकनंतर मुंबई इंडियन्सचा आणखी एक PBKS च्या ताफ्यात

तो पुढे म्हणाला की, 'ही लीग विविध जेंडरच्या खेळाडूंना सहभागी होण्याची, योगदान देण्याची आणि खेळाच्या विकासाचा भाग बनण्याची संधी देईल. क्रिकेट २०२८ मध्ये ऑलिम्पिक खेळांमध्ये पुनरागमन करणार आहे. यामुळे खेळाची पोहोच नवीन लोकांपर्यंत वाढवण्याची आणि जागतिक स्तरावर विस्तारण्याची एक महत्त्वपूर्ण संधी आहे. 'इक्वल'चे वैशिष्ट्य हे आहे की, यामध्ये एक पुरुष आणि एक महिला क्रिकेटपटू एकाच मैदानावर स्पर्धा करतील.'

मिक्स्ड जेंडरटी२० लीगचे स्वरूप कसे असेल?

'इक्वल' टी२० लीगच्या सुरुवातीच्या स्वरूपात पाच संघ सहभागी होतील आणि १२ सामने खेळतील. प्रत्येक संघात १८ खेळाडू असतील. परंतु, अंतिम ११ खेळाडूंबाबत विशेष नियम निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये सहा महिला आणि पाच पुरुष खेळाडूंचा समावेश असेल.

याचा अर्थ असा की, लीगच्या प्रत्येक सामन्यात पुरुष आणि महिला क्रिकेटपटू एकत्र खेळतील. पुरुष आणि महिला क्रिकेटपटू एकाच संघासाठी मैदानावर एकत्र खेळताना दिसण्याची ही पहिलीच वेळ असेल. क्रिकेटच्या जगातील हा नवीन प्रयोग खेळाला एका नवीन पद्धतीने सादर करण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

Photo - Ai Generated
IND vs NZ: दुसऱ्या कसोटीत कर्णधार गिलचा मोठा गेमप्लॅन! सिराजचं कमबॅक, प्रसिद्ध कृष्णाचा पत्ता कट? कशी असेल भारताची संभाव्य Playing 11