Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झिम्बाब्वे टी-२० विश्वचषकासाठी पात्र! केनियाच्या पदरी निराशा;आतापर्यंत ‘हे’ १७ संघ  ठरले पात्र

झिम्बाब्वे संघ २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. झिम्बाब्वेने केनियाचा ७ विकेट्सने पराभव करून टी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यात यश मिळवले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 03, 2025 | 08:42 AM
Zimbabwe qualifies for T20 World Cup! Kenya's disappointment; 'These' 17 teams have qualified so far

Zimbabwe qualifies for T20 World Cup! Kenya's disappointment; 'These' 17 teams have qualified so far

Follow Us
Close
Follow Us:

Zimbabwe qualified for the 2026 T20 World Cup : झिम्बाब्वे संघाने मोठी कामगिरी केली आहे. झिम्बाब्वे संघ २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. झिम्बाब्वेने केनियाचा ७ विकेट्सने पराभव करून टी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यात यश मिळवले आहे. झिम्बाब्वेपूर्वी नामिबिया संघाकडून २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यात यश आले होते.

झिम्बाब्वेच्या पात्रतेसह, एकूण १७ संघांनी विश्वचषक २०२६ साठी पात्रता मिळवली आहे. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या २०२६ च्या विश्वचषकासाठी फक्त तीन संघ पात्रता मिळवण्यापासून बाकी आहेत. ते आशिया-पूर्व आशिया पॅसिफिक पात्रता फेरीतून पात्र ठरणार आहेत. तीन स्थानांसाठी नऊ संघ स्पर्धा करणार आहेत. ८ ऑक्टोबरपासून ओमानमध्ये आशिया-ईएपी पात्रता स्पर्धा खेळवली जाईल.

हेही वाचा : ICC Women Cricket World Cup 2025 : क्रिकेटचे मैदानावर राजकीय नाट्य? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच तापला ‘हा’ मुद्दा

 आशिया-ईएपी पात्रता स्पर्धेत भाग घेणारे संघ

आगामी टी२० विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. ज्यात आशिया आणि पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता फेरीतून पात्र ठरलेल्या संघांसाठी तीन जागा राखीव असणार आहेत. जपान, कुवेत, मलेशिया, नेपाळ, ओमान, पापुआ न्यू गिनी (पीएनजी), कतार, सामोआ आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) हे टी२० विश्वचषकातील तीन जागांसाठी स्पर्धा करताना दिसणार आहेत.

केनियाच्या पदरी आली निराशा

झिम्बाब्वे अंतिम फेरीत पोहोचल्याने केनियाचे स्वप्न भंग झाले. केनियाविरुद्ध झिम्बाब्वेचा सामना एकतर्फीच झाला. झिम्बाब्वेने फक्त तीन विकेट्स गमावून सामना खिशात घातला. केनियाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली होती, परंतु उपांत्य फेरीत झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवता न आल्याने टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरण्याच्या शर्यतीतून हा बाहेर पडला आहे.

हेही वाचा : PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव; ७ विकेट्सने चारली धूळ

झिम्बाब्वेने मारली बाजी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या केनिया संघाने सहा विकेट्स गमावून १२२ धावा उभ्या केल्या. संघाकडून राकेप पटेलने ६५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या झिम्बाब्वेने १५ षटकांत ३ गडी राखून विजय मिळवला आणि टी२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली.  झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने २५ चेंडूत ५१ धावा करत २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी झिम्बाब्वेच्या पात्रतेत महत्त्वाची भूमिका बजावली. मुरमानीने देखील ३९ धावा केल्या.

२०२६ च्या विश्वचषकात स्थान मिळवलेले १७ संघ खालीलप्रमाणे

२०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी एकूण १७ संघांनी स्थान मिळवले आहे . यामध्ये भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अमेरिका, कॅनडा, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, नेदरलँड्स, झिम्बाब्वे, नामिबिया आणि इटली या संघाचा  समावेश आहे. आणखी तीन संघांचा समावेश अद्याप बाकी आहे.

Web Title: Zimbabwe qualifies for 2026 t20 world cup kenya disqualified

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 08:42 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.