
Excitement in the cricket world! Drug addict player's career ruined! Permanent expulsion from the team
Shawn Williams turns out to be a drug addict :क्रिकेट जगतात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. झिम्बाब्वेचा अनुभवी अष्टपैलू शॉन विल्यम्सची कारकीर्द आता संपल्याचे मानले जाऊ लागले आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे की, भविष्यात त्याची राष्ट्रीय संघात निवड करण्यात येणार नाही. T20 विश्वचषक आफ्रिका पात्रता 2025 सुरू होण्यापूर्वी विल्यम्सने संघातून माघार घेतल्यानंतर हा निर्णय घेतला गेला आहे.
हेही वाचा : IND vs PAK सामन्यांतील वादावर ICC चा मोठा निर्णय; Haris Rauf दोन सामन्यांसाठी निलंबित, सूर्यकुमारलाही दंड
बोर्डाच्या मते, त्याच वेळी अँटी-डोपिंग चाचण्या नियोजित होत्या आणि विल्यम्सने ड्रग्जच्या व्यसनाशी झुंजण्याची कबुली दिली. या खुलाशाने संपूर्ण झिम्बाब्वे क्रिकेट जगताला हादरवून टाकले. बोर्डाने असे देखील स्पष्ट केले आहे की त्याने पुनर्वसन कार्यक्रमात भाग घेऊन सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आयाला असला तरी, संघाच्या प्रतिमेमुळे आणि भविष्यामुळे त्याला दुसरी संधी देण्यात येणार नाही. शिवाय, ३१ डिसेंबर २०२५ नंतर त्याचा केंद्रीय कराराचे नूतनीकरण देखील करण्यात येणार नाही.
शॉन विल्यम्सने २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या कारकिर्दीत, त्याने झिम्बाब्वे क्रिकेटला अनेक महत्त्वाचे विजय देखील मिळवून दिले आणि तो संघातील सर्वात विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक मानला जाऊ लागला होता. मर्यादित संसाधने असून देखील त्याने संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत कर्णधारपद देखील स्वीकारले. तथापि, ड्रग्ज वादामुळे आता त्याची प्रतिमा पूर्णता डागाळली असून बोर्डाच्या निर्णयानंतर, विल्यम्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता जवळपास संपली असे मानण्यात येत आहे.
शॉन विल्यम्स सध्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करत असल्याची माहिती समोर आली आहे, ती आता त्याचे जीवन पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. चाहत्यांना आशा आहे की तो कोचिंग, कॉमेंट्री किंवा मेंटरिंगसारख्या नवीन भूमिकेत क्रिकेटमध्ये परतण्याची शक्यता आहे. तथापि, हे स्पष्ट आहे की झिम्बाब्वे क्रिकेटचे एकेकाळी भरवशाचे नावे आता मैदानावर खेळताना दिसणार नाही आणि त्याची कहाणी क्रिकेट इतिहासातील सर्वात वादग्रस्त शेवटांपैकी एक म्हणून नोंदवली जाण्याची शक्यता आहे.