
इन्स्टाग्राम : इन्स्टाग्रामने (Instagram) एका ब्लॉग पोस्टमध्ये याविषयी माहिती दिली आहे. लहान कंटेट क्रिएटर्सना या बदललेल्या अल्गोरिदममुळे फायदा होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. इन्स्टाग्रामने आपल्या अल्गोरिदमसंदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर ओरिजिनल कंटेटला जास्त प्राधान्य असे नियम बदलले आहेत. त्यामुळे इन्स्टाग्राम वापरणाऱ्या सर्वांनाच हे नियम माहिती असणे गरजेचे आहे. इन्स्टाग्रामने एका ब्लॉग पोस्टमध्ये याविषयी माहिती दिली आहे. लहान कंटेंट क्रिएटर्सना या बदललेल्या अल्गोरिदममुळे फायदा होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच दुसऱ्यांचा कंटेंट रिपोस्ट करणाऱ्यांना यामुळे आळा बसणार आहे. कंपनीने नेमके काय बदल केले आहेत, जाणून घेऊया.
1. डुप्लिकेट कंटेट
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामच्या रिकमेंडेशन फीडमधून आता रिपोस्ट केलेल्या पोस्टना हटवण्यात येणार आहे. यामुळे डुप्लिकेट कंटेंट कमी होण्यास मदत होईल. तसेच, दुसऱ्यांच्या पोस्ट वारंवार रिपोस्ट करणाऱ्या युजर्ससाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे. जर एखादया युजरने 30 दिवसांच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांचा कंटेट दहापेक्षा अधिक वेळा रिपोस्ट केला, तर त्या पोस्ट रिकमेंडेशनमध्ये घेता येणार नाहीत.
2. पोस्ट-रिपोस्ट
इन्स्टाग्रामवर रिपोस्ट करुन हजारोंमध्ये व्ह्यू आणि लाईक्स मिळवणारे भरपूर अकाउंट आहेत. मात्र, आता या अकाउंट्सना मिळणारा भाव कमी होणार आहे. एखादा रिपोस्ट केलेला कंटेट व्हायरल होत असला, तरीही रिकमेंडेशनमध्ये ओरिजिनल पोस्टलाच प्राधान्य दिले जाणार आहे.
3. लहान क्रिएटर्स
इन्स्टाग्रामच्या या बदललेल्या अल्गोरिदमचा फायदा लहान कंटेट क्रिएटर्सना होणार आहे. ज्या लोकांना कमी फॉलोवर्स आहेत मात्र ते ओरिजिनल कंटेंट पोस्ट करत आहेत त्यांना आता इन्स्टाग्राम अधिक संधी देणार आहे. यापूर्वी केवळ अधिक फॉलोवर्स असणाऱ्या युजर्सना रिकमेंडेशनमध्ये प्राधान्य दिले जात होते, मात्र आता हे बदलणार आहे.
4. ओरिजिनल कंटेंट क्रिएटर
इन्स्टाग्रामवर आता ओरिजिनल कंटेंट शेअर करणाऱ्यांना वेगळी ओळख मिळणार आहे. ओरिजिनल पोस्टवर ‘ओरिजिनल कंटेंट क्रिएटर’ असे लेबल मिळणार आहे. यामुळे ती पोस्ट रिपोस्ट केल्यानंतरदेखील ओरिजिनल कंटेंट कुणाचा आहे हे लक्षात येणार.