फोटो सौजन्य- pinterest
Airtel ने रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली होती. युजर्सची नाराजी दूर करण्यासाठी आता Airtel ने एक मोठा निर्णय घेतला आहे. Airtel ने त्यांच्या 5G सेवेत बदल करण्याच ठरवलं आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर आता Airtel युजर्सना सुपरफास्ट नेटवर्क मिळणार आहे. Airtel ने युजर्सची 5G नेटवर्कची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने मिड-बँड स्पेक्ट्रमचा विस्तार करण्याचं ठरवलं आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक Airtel कडे ओढले जातील. Airtel देशभरात 1800, 2100, 2300 MHz बँड्सवर 5G सेवांचा विस्तार करण्यासाठी मिड-बँड स्पेक्ट्रमचा वापर करत आहे.
हेदेखील वाचा- OLA वर भारतीय नेव्हिगेशन कंपनीचा मोठा आरोप; कारवाई होण्याची शक्यता
Airtel ने आपल्या 5G सेवांचा विस्तार करण्यासाठी एक नवीन योजना आखली आहे. Airtel ने याबाबत सांगितलं आहे की, कंपनी त्यांच्या 5G सेवा सुधारण्यासाठी आणि 5G च्या नेटवर्कची वाढती आवश्यकता लक्षात घेऊन सध्याच्या मिड-बँड स्पेक्ट्रमचे पुन्हा विस्तार करत आहे. आम्ही 5G नेटवर्कचा विस्तार करत आहोत. 5G च्या नेटवर्कची मागणी वाढत आहे, आणि अशा परिस्थितीत आपली नेटवर्क व्यवस्था सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. Airtel देशभरात त्यांच्या 1800, 2100, 2300 MHz बँडवर 5G नेटवर्कची मागणी पूर्ण करण्यासाठी मिड-बँड स्पेक्ट्रमचा विस्तार करत आहे. मिड-बँड स्पेक्ट्रमचा वापर करून, ग्राहकांना चांगलं इनडोअर कव्हरेज आणि पूर्वीपेक्षा वेगवान ब्राउझिंग मिळणार आहे. डेटाची वाढती मागणी लक्षात घेता, आपल्या ग्राहकांना एक उत्तम 5G अनुभव देण्यासाठी स्पेक्ट्रमचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेदेखील वाचा- WhatsApp युजर्ससाठी खुशखबर! Instagram चं भन्नाट फीचर आता WhatsApp वर येतंय
पूर्वी 4G सेवा प्रदान करण्यासाठी वापरण्यात येणारा बँड आता सुधारला जाईल आणि 5G सेवा देण्यासाठी वापरला जाईल. कंपनीने सांगितलं आहे की, ते स्टँड-अलोन तंत्रज्ञान लाँच करण्याच्या तयारीत आहेत. स्टँड-अलोन तंत्रज्ञान लाँच केल्यानंतर Airtel नेटवर्क हे भारतातील पहिले नेटवर्क असेल जे स्टँड-अलोन आणि नॉन-स्टँड अलोन मोडवर काम करेल. स्टँड-अलोन आणि नॉन-स्टँड अलोन स्विचच्या प्रायोगिक चाचण्या रेवाडी, चेन्नई आणि भुवनेश्वर या ठिकाणी घेण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचे रिझल्ट अतिशय उत्तम आले आहेत. Airtel चे 5G रोल-आउट देशातील सर्वात जलद आहे आणि आता सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे.
Airtel चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी रणदीप सेखॉन यांनी सांगितलं की, अधिकाधिक ग्राहक आमच्या 5G सेवांचा वापर करत असल्याने आम्ही आमचे मिड-बँड स्पेक्ट्रम पुन्हा तयार करत आहोत. जे 4G सेवांसाठी वापरले जात होते. यासोबतच आम्ही स्टँडअलोन तंत्रज्ञान सादर करण्यासही तयार आहोत. याचा अर्थ असा होईल की Airtel हे भारतातील पहिले नेटवर्क असेल जे ‘स्टँडअलोन’ आणि ‘नॉन-स्टँडअलोन’ दोन्ही मोडमध्ये चालेल, जे आम्हाला बाजारात सर्वोत्तम अनुभव प्रदान करण्यात मदत करेल.