आनंद महिंद्रा यांनी AI चं कौतुक करत पोस्ट शेअर केली (फोटो सोजन्य - pinterest)
भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा अनेकदा प्रगत तंत्रज्ञानावर आपले मत मांडतात. आता त्यांनी AI बद्दल मोठा दावा केला आहे. AI अतिशय उपयुक्त तंत्रज्ञान असून केवळ फोटो काढण्यापुरते मर्यादित नसून त्याहूनही अधिक उपयुक्त आहे. पुढील 5 वर्षांत AI कॅन्सरबाबत माहिती देऊ शकेल, असा दावा आनंद महिंद्रा यांनी केला आहे. AI ब्रेस्ट कॅन्सर विकसित होण्याच्या सुमारे 5 वर्षांपूर्वी कसा शोधू शकतो, याबाबत संशोधन केलं जात होतं. या संशोधनावर आता आनंद महिंद्रा यांनी त्यांचे मत मांडलं आहे. याबाबत त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट देखील केली आहे.
हेदेखील वाचा- भारतातील 53 पैकी 52 ॲप फसवे नमुने वापरतात; एएससीआय अकॅडमी आणि पॅरलल यांचा अहवाल
आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हे संशोधन अचूक असल्याचे सिद्ध झाले तर ते आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. AI फोटो बनवण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त उपयुक्त ठरेल. या पोस्टसोबतच त्यांनी संशोधनाची एक जुनी पोस्ट रिशेअर केली आहे. अलीकडेच, अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठातील संशोधकांनी नवीन AI विकसित केलं आहे. हे AI मॉडेल ब्रेस्ट कॅन्सर विकसित होण्याच्या सुमारे 5 वर्षांपूर्वी त्याबाबत माहिती देऊ शकेल, असा दावा संशोधकांनी केला आहे. संशोधकांच्या याच दाव्यावर आनंद महिंद्रा यांनी त्यांचे मत व्यक्त करत AI चे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
हेदेखील वाचा- फ्लिपकॉर्टने सुरु केली Flipkart Minutes सर्विस! आता 15 मिनिटांत मिळणार सामानाची डिलीवरी
कॅन्सर शोधण्याची पारंपारिक पद्धत म्हणजे बायोप्सी, मायक्रोस्कोपिक हिस्टोलॉजिकल तपासणी. याशिवाय एमआरआय, सीटी आणि पीईटी स्कॅनसारखे इमेजिंग तंत्रज्ञान याव्दारे देखील कॅन्सरबाबत माहिती मिळवली जाते. पण यासाठी फार मोठा कालावधी लागतो. अनेकदा लोकांना त्यांच्या लास्ट स्टेजला कॅन्सरविषयी माहिती मिळते. अशा परस्थितीत कॅन्सरची समस्या अतिशय गंभीर बनते आणि कॅन्सर रुग्णांना त्यांचा जीव गमवावा लागतो. पण आता अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठातील संशोधकांनी तयार केलेलं AI मॉडेल ब्रेस्ट कॅन्सर विकसित होण्याच्या सुमारे 5 वर्षांपूर्वी त्याबाबत माहिती देऊ शकेल. त्यामुळे रुग्णांना या कॅन्सरसोबत लढण्यास मदत होऊ शकेल. AI केवळ वैद्यकीय प्रतिमांचे विश्लेषण करून कर्करोगाचे अहवाल अधिक अचूकतेने देऊ शकते, असा दावा अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.
दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी गेल्या वर्षी देखील एक पोस्ट करत त्यांचा एक फोटो शेअर केला होता. या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांचा फोटो AI च्या मदतीने तयार करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आनंद महिंद्रा यांनी AI बाबत एक पोस्ट शेअर केली आहे. पण यावेळी त्यांनी AI चे कौतुक करण्यासाठी पोस्ट शेअर केली आहे.