भारतात लाँच होण्यापूर्वीच iPhone 16 चे फिचर्स आणि किंमत आली समोर! वाचा किती स्वस्त असेल नवीन iPhone? (फोटो सौजन्य - pinterest)
भारतातील प्रत्येक iPhone युजर्सची नजर 9 सप्टेंबरवर आहे, कारण उद्या 9 सप्टेंबर रोजी Apple चा ग्लोटाईम इव्हेंट 2024 आयोजित करण्यात आला आहे. त्यामूळे प्रत्येक iPhone युजर्सची नजर उद्या होणाऱ्या Apple ग्लोटाईम इव्हेंट 2024 वर आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी नवीन iPhone 16 सीरीज लाँच करत आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max हे चार मॉडेल्स लाँच करणार आहे. याशिवाय या ईव्हेंटमध्ये AirPods 4 आणि Watch Series 10 देखील लाँच होण्याची अपेक्षा आहे.
हेदेखील वाचा- ब्राझीलने एक्सवर बंदी घातल्यानंतर मस्कने उडवली खिल्ली,’आम्ही द्वेष पसरवणाऱ्यांच्या विरोधात आहोत…’
iPhone 16 या सिरीजचे फिचर्स आणि किंमत जाणून घेण्यासाठी आयफोन युजर्स प्रचंड उत्सुक आहेत. उद्या होणाऱ्या इव्हेंट पूर्विच iPhone चे फिचर्स आणि किंमत याची माहिती लीक झाली आहे. तुम्हीही उद्या Apple च्या इव्हेंट मध्ये लाँच होणाऱ्या नवीन आयफोनची वाट पाहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. वास्तविक, लाँच होण्यापूर्वीच iPhone 16 च्या किंमतीबाबत एक नवीन अहवाल समोर आला आहे. नवीन आयफोनच्या किंमतीबाबत Apple Hub चा हा अहवाल खास बनला आहे. या अहवालासह, भारतातील iPhone 16 सीरीजच्या अपेक्षित किंमतीबाबत माहिती समोर आली आहे.
Apple Hub च्या अहवालानुसार, iPhone 16 बेस मॉडेलची किंमत 799 डॉलर असल्याचे मानले जात आहे. म्हणजेच iPhone 16 बेस मॉडेलची किंमत भारतात सुमारे 66,300 रुपये असू शकते. iPhone 16 Plus च्या किंमतीबद्दल असे मानले जात आहे की हे मॉडेल 899 डॉलर्स म्हणजेच 74,600 रुपयांमध्ये लाँच केले जाऊ शकते. जर आपण प्रो मॉडेलबद्दल बोललो तर कंपनी iPhone 16 सीरिमधील प्रो मॉडेल 1,099 डॉलर्स मध्ये लाँच करू शकते. ज्याची भारतात किंमत जवळपास 91,200 रुपये असू शकते. टॉप मॉडेल iPhone 16 Pro Max बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 1,199 डॉलर्स म्हणजेच भारतात सुमारे 99,500 रुपयांना लाँच केला जाऊ शकतो.
हेदेखील वाचा- Pova 6 Neo 5G स्मार्टफोन या दिवशी होणार लाँच! AI फीचर्स आणि 108MP कॅमेऱ्याने सुस्सज
iPhone 16 सीरीजच्या वेगवेगळ्या मॉडेल्सची ही किंमत गेल्या वर्षी 2023 मध्ये लाँच झालेल्या आयफोन 15 सीरीजसारखीच असल्याचे दिसते. मात्र, नवीन आयफोनची खरी किंमत जाणून घेण्यासाठी तुम्हाला आणखी काही तास वाट पाहावी लागणार आहे. Apple इव्हेंट उद्या भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता लाईव्ह होणार आहे. Apple त्याच्या ग्लोटाइम इव्हेंटसाठी (Apple ग्लोटाइम इव्हेंट 2024) पूर्णपणे तयार आहे. प्रत्येक आयफोन वापरकर्त्याच्या नजरा उद्या म्हणजेच 9 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या Apple इव्हेंटवर आहेत.
iPhone 16 सिरीजचा लाँच इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता Apple पार्क, क्यूपर्टिनो, यूएस येथील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये सुरू होईल. भारतात, हा कार्यक्रम कंपनीच्या वेबसाइट, Apple टीव्ही आणि यूट्यूबवर लाईव्ह पाहता येणार आहे. Apple ने आधीच आपल्या YouTube चॅनेलवर एक इव्हेंट प्लेसहोल्डर शेअर केला आहे.