फोटो सौजन्य - pinterest
जग प्रसिध्द आणि लोकप्रिय कंपना Apple ने tvOS 18 बीटा अपडेट लाँच केलंं आहे. जूनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या Annual Developer Conference दरम्यान Apple ने tvOS 18 सादर केलं होतं. त्यानंतर आता हे अपडेट अखेर लाँच करण्यात आलं आहे. Apple TV युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी Apple ने tvOS 18 बीटा अपडेट लाँच केलंं आहे. हा अपडेट सध्या नॉन-डेव्हलपरसाठी रिलीज लाँच करण्यात आला आहे. नॉन-डेव्हलपर्स tvOS 18 ची चाचणी करतील, आणि त्यानंतर हे अपडेट सर्वांसाठी लाँच करण्यात येणार आहे. tvOS 18 मुळे Apple TV युजर्सचा अनुभव अधिक सुधारणार आहे. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही tvOS 18 कशा प्रकारे डाऊनलोड करू शकता.
Apple TV मध्ये tvOS 18 बीटा अपडेट डाऊनलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:
कंपनीने tvOS 18 मध्ये InSight चे फीचर देखील दिले आहे. त्याच्या मदतीने युजर्सचा अनुभव आणखी चांगला होईल. InSight फीचरमध्ये युजर्स जे काही कंटेंट पाहत आहेत त्याची माहिती मिळेल. यामध्ये तुम्हाला कलाकारांची माहिती, चित्रपट कुठे शूट करण्यात आला आणि इतर अनेक रंजक गोष्टी सांगितल्या जातील. tvOS 18 मध्ये Enhance Dialogue फंक्शन अपडेट केले गेले आहे. यामध्ये आवाज क्वॉलिटीवर भर देण्यात आला आहे. tvOS 18 टीव्ही स्पीकर, एअरपॉड्स आणि ब्लूटूथ हेडफोनसह कार्य करते.
याशिवाय tvOS 18 बीटा अपडेटमध्ये सबटायटल फीचरवरही काम करण्यात आले आहे. जेव्हा जेव्हा टीव्ही म्यूट होतो किंवा ऑडिओ नीट समजत नाही, अशावेळी सबटायटल्स आपोआप दिसू लागतील. tvOs 18 मुळे युजर्सचा सिनेमा पाहण्याचा अनुभव अधिक चांगला होईल. यासोबतच या अपडेटमध्ये लाइव्ह कॅप्शन फंक्शन देखील देण्यात आले आहे. एकूणच हे नवं फीचर युजर्ससाठी वरदान ठरणार आहे.
tvOS 18 मुळे Apple TV युजर्सचा अनुभव अधिक सुधारणार आहे. जूनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या Annual Developer Conference दरम्यान Apple ने tvOS 18 सादर केलं होतं. त्यानंतर आता हे अपडेट अखेर लाँच करण्यात आलं आहे. हा अपडेट सध्या नॉन-डेव्हलपरसाठी रिलीज लाँच करण्यात आला आहे. नॉन-डेव्हलपर्स tvOS 18 ची चाचणी करतील, आणि त्यानंतर हे अपडेट सर्वांसाठी लाँच करण्यात येणार आहे.