Google Play Store वर या भारतीय अॅप्सची हवा! 2024 चे सर्वोत्कृष्ट ॲप्स ठरले, वाचा संपूर्ण यादी
गुगल प्ले स्टोअरने 2024 मधील सर्वोत्कृष्ट ॲप्सची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भारतीय अॅप्सने बाजी मारली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुगल प्ले स्टोअरने सर्वोत्कृष्ट ॲप्ससाठी पुरस्कार जाहीर केले आहेत. हे पुरस्कार विविध कॅटेगिरीमधील ॲप्ससाठी आहेत. गूगल प्ले स्टोरने भारतात वापरल्या जाणाऱ्या सर्वात इनोवेटिव, एंगेजिंग आणि इंपॅक्टफुल ॲप्स आणि गेमची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यांना पुरस्कारही देण्यात आला आहे. ॲप्ससोबतच, गुगलने टॅलेंटेड डेवलपर्सना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या पुरस्कारांबाबत गुगलने माहिती दिली आहे. गुगलने याबाबत सांगितलं की, या वर्षी युजर्सच्या सोयी लक्षात घेऊन अनेक ॲप्स डेवलप करण्यात आले आहेत. या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ॲप्समध्ये फॅशन स्टाइलिंग, आरोग्य, एक्सपेंस ट्रॅकिंग आणि बातम्या इत्यादींचा समावेश आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट ॲप्सचा पुरस्कार मिळवणाऱ्या 7 पैकी 5 ॲप्स भारतीय कंपन्यांनी डेवलप केले आहेत. ही प्रत्येक भारतीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट ॲप्स आणि गेम्सचा पुरस्कार कोणत्या ॲप्सना देण्यात आला आहे, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा