
BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी पुन्हा घेऊन आली बजेट फ्रेंडली प्लॅन! 400 रुपयांहून कमी किमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी
सरकारी टेलिकॉम कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी एक बजेट फ्रेंजली रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची किंमती 400 रुपयांपेक्षा कमी असून कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 50 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना कमी पैशांत दिर्घकाळ व्हॅलिडीटी, डेटा आणि इतर फायदे देखील ऑफर केले जाणार आहेत. हा प्रीपेड प्लॅन अशा यूजर्ससाठी तयार करण्यात आला आहे, ज्यांना कमी किंमतीत जास्त व्हॅलिडीटी पाहिजे असते. कंपनीने लाँच केलेला हा नवीन रिचार्ज प्लॅन कमी बजेट असणाऱ्या यूजर्समध्ये अतिशय वेगाने लोकप्रिय होत आहे. या प्लॅनमध्ये कोणते फायदे ऑफर केले जाणार आहेत आणि या प्लॅनची किंमत काय असणार आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने लाँच केलेल्या नवीन बजेट फ्रेंडली रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 347 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 50 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे. या किंमतीत ऑफर केला जाणार हा बेस्ट रिचार्ज प्लॅन मानला जात आहे. कारण प्रायव्हेट कंपन्यांच्या तुलनेत हा प्लॅन अतिशय स्वस्त आणि फायदेशीर आहे. याशिवाय, कंपनीच्या या लेटेस्ट प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देखील ऑफर केले जाते, ज्यामुळे यूजर्स कोणत्याही एक्स्ट्रा चार्जशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा घेऊ शकतात. डेटाबद्दल बोलायचं झालं तर कंपनीच्या या प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा ऑफर केला जातो. म्हणजेत यूजर्सना संपूर्ण 50 दिवसांत 100GB डेटा मिळणार आहे. 2GB डेली डेटा सोशल मीडिया स्क्रॉल करण्यासाठी, व्हिडीओ स्ट्रीम करण्यासाठी आणि पूर्ण दिवस ऑनलाइन ब्राउज करण्यासाठी पुरेसा आहे.
Christmas 2025: यंदा चॉकलेट्स नाही तर प्रियजनांना गिफ्ट करा हे गॅझेट्स, किंमत तुमच्या बजेटमध्ये
कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्ससह कंपनी या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 100 एसएमएसची सुविधा देखील दिली जाणार आहे. BSNL द्वारे ऑफर केली जाणारी स्टेबल कनेक्टिविटी या प्लॅनला आणखी खास बनवते. कंपनीने आधीच अनेक क्षेत्रांमध्ये आपली 4G सेवा सुरू केली आहे आणि BSNL देखील लवकरच आपले 5G नेटवर्क सुरू करण्याची तयारी करत आहे.स्टूडेंट्स, सीनियर सिटिजन्स आणि सेकेंडरी BSNL सिम वापरणाऱ्या यूजर्ससाठी हा एक चांगला ऑप्शन ठरणार आहे.
Ans: डेटा-केन्द्रित, व्हॉइस (कॉल) आणि कॉम्बो प्लान्स (डेटा + कॉल + SMS) उपलब्ध आहेत.
Ans: अनेक प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल्स, दैनिक डेटा लिमिट आणि SMSचा समावेश असतो.
Ans: हो, 300-365+ दिवसांची वैधता मिळणारे वार्षिक किंवा दीर्घकालीन प्लान आहेत.