फोटो सौजन्य - सोशल मिडीया
इंस्टाग्राम आणि फेसबुकवर गेल्या काही दिवसांपासून Meta ने एक नवीन अपडेट आणले होते. या अपडेटमध्ये तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर एखादी एखादी पोस्ट शेअर करताना तुम्हाला त्यामध्ये ‘Made with AI’ हे लेबल अॅड करण्याचं ऑप्शन यायचं. तुम्ही पोस्ट शेअर करताना ‘Made with AI’ हे लेबल ऑन केल्यास तुमच्या पोस्टच्या वरच्या बाजूला एक लेबल दिसायचं. ज्यामध्ये ‘Made with AI’ लिहीलेलं असायंच. पण आता Meta ने हे लेबल बदललं आहे.
Meta ने ‘Made with AI’ लेबल ‘AI info’ असं केलं आहे. याबाबत Meta ने घोषणा केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला पोस्ट शेअर करताना ‘Made with AI’ लेबल नाही तर ‘AI info’ असं लेबल येणार आहे. इतर युजर्स जेव्हा तुमच्या पोस्टवरील ‘AI info’ या लेबलवर क्लिक करतील, तेव्हा त्यांना पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या AI बद्दल माहिती दिली जाईल. त्यामुळे सर्व युजर्सना AI सह बनवलेले फोटो आणि व्हिडिओ समजून घेण्यास मदत होईल, असा दावा Meta ने केला आहे.
Meta ने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर काही दिवसांपूर्वी ‘Made with AI’ हे नवं लेबल लाँच केलं होतं. मात्र यामुळे Meta वर अनेकांनी टीका केली. तसेच काही युजर्सनी देखील ‘Made with AI’ लेबलबद्दल नाराजी व्यक्त केली. काही युजर्सनी तक्रार केली होती की, ‘Made with AI’ लेबलमुळे त्यांच्या मूळ पोस्टचे चुकीचे वर्णन केले जाते. Meta ने ही चुक मान्य करत लेबल अपडेट केलं. त्यानंतर आता Meta ने ‘Made with AI’ हे लेबल ‘AI info’ सोबत बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
Meta ने केवळ लेबलचं नावच बदललं नाही तर त्यामध्ये अनेक बदल देखील करण्यात आले आहेत. इतर युजर्स जेव्हा तुमच्या पोस्टवरील ‘AI info’ या लेबलवर क्लिक करतील, तेव्हा त्यांना पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या AI बद्दल त्यांना माहिती दिली जाईल. ज्यांना AI बद्दल काहीच माहिती नाही अशा लोकांसाठी हे लेबल अत्यंत फायदेशीर ठरेल.