Smartphone Storage Chips: नवा स्मार्टफोन घेण्याआधी 'हे' वाचा! चिप्स स्वस्त होऊनही फोनच्या किमती का उतरणार नाहीत?

चीनच्या खुल्या बाजारात स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या NAND फ्लॅश स्टोरेज चिप्सच्या किमती काही आठवड्यांत 20 टक्क्यांनी घसरल्या आहेत. मात्र, मोठ्या कंपन्यांचे अधिकृत करार दर अजूनही चढे आहेत.
Smartphone Storage Chips
Smartphone Storage Chips (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 
  1. चीनमध्ये NAND चिप्सच्या किमती 20% घसरल्या.

  2. AI मुळे RAM आणि LPDDR मेमरीचा तुटवडा कायम.

  3. 2027 पर्यंत स्मार्टफोन स्वस्त होण्याची शक्यता कमी.

China Smartphone Memory Chip Prices Drop: चीनच्या खुल्या बाजारात स्मार्टफोन स्टोरेज चिप्स म्हणजे NAND फ्लॅशच्या किमती अवघ्या काही आठवड्यांत 20 टक्क्यांनी कोसळल्यात. रोख रकमेची चणचण आणि गोदामाचा खर्च वाचवायला चिनी डिस्ट्रीब्यूटर्स सवलतीच्या दरात माल विकतात. मात्र, याचा थेट फायदा ग्राहकांना लगेच मिळणार नसून नवे फोन स्वस्त व्हायला 2027 पर्यंत वाट बघावी लागणार आहे, याविषयी सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊया.

मेमरी चिप्सच्या वाढत्या किमतींमुळे त्रासलेल्या स्मार्टफोन बाजाराला चीनमधून मोठा दिलासा मिळाला. तिथल्या खुल्या बाजारात स्टोरेज चिप्सचे दर 20 टक्क्यांनी घटलेत. पण, मोठ्या कंपन्यांचे अधिकृत करार दर अजून चढेच असल्याने आणि AI सर्व्हरमुळे रॅमचा तुटवडा कायम असल्याने नवे स्मार्टफोन लगेच स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी फेटाळून लावली आहे.

• नेमकं काय घडतंय?

आंतरराष्ट्रीय मार्केट रिसर्च संस्था TrendForce आणि बँक ऑफ अमेरिकाच्या ताज्या रिपोर्टनुसार बाजारातलं चित्र असं आहे.

1. NAND स्टोरेजमध्ये मोठी घसरण : ऑक्टोबरच्या मध्यापासून आतापर्यंत NAND फ्लॅशच्या स्पॉट किमतींमध्ये जवळपास 20 टक्के घट झाली आहे. 512 Gb वेफरच्या किमती तिमाही आधारावर 32 टक्क्यांनी घसरून 14.30 डॉलरवर आल्यात.

2. कॉम्प्युटर मेमरी स्वस्त, पण फोन मेमरीचा तुटवडा कायम : 25 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार, कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या मेनस्ट्रीम DDR4 चिप्सच्या स्पॉट किमती गेल्या चार आठवड्यांत 7.6 टक्क्यांनी घटल्यात. मात्र, स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या LPDDR मेमरीचा तुटवडा अजून कायम आहे.

3. किमती घटण्याचं कारण : स्मार्टफोन आणि PC ची विक्री मंदावल्यामुळे चिनी कंपन्यांनी नव्या ऑर्डर्स कमी केल्यात. तसंच, चीनमधल्या स्थानिक चिप उत्पादक कंपनी YMTC ने उत्पादन वाढवल्याने बाजारात माल पडून राहिला.

Smartphone Storage Chips
Apple प्रेमींसाठी धमाका! iPhone 16 आणि 17 Pro Max वर जबरदस्त डील; किंमती ऐकून व्हाल थक्क

• मग स्मार्टफोन लगेच स्वस्त होणार का?

तज्ज्ञांच्या मते, चिप मार्केटमधल्या या घसरणीचा फायदा सामान्य ग्राहकांना लगेच मिळण्याची शक्यता कमी आहे. यामागे तीन मोठी कारणं आहेत.

1. स्पॉट आणि कॉन्ट्रॅक्ट दरातली तफावत : ही घसरण फक्त खुल्या बाजारातल्या व्यापाऱ्यांच्या पातळीवर आहे. सॅमसंग, SK Hynix आणि Micron सारख्या मोठ्या कंपन्यांचे अधिकृत करार दर अजून चढेच आहेत.

2. AI चा दबाव कायम : आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर्समुळे आधुनिक DRAM आणि LPDDR मेमरीचा तुटवडा अजून कायम आहे. Goldman Sachs रिपोर्टनुसार, 2027 मध्ये DRAM चा तुटवडा आणखी तीव्र होऊ शकतो.

3. स्मार्टफोन कंपन्यांचा सावध पवित्रा : वाढत्या खर्चामुळे Xiaomi, Oppo आणि Vivo सारख्या कंपन्यांनी 2027 साठी आपलं स्मार्टफोन उत्पादनाचं लक्ष्य आधीच कमी केलं.

Counterpoint Research च्या ताज्या रिपोर्टनुसार, मेमरी संकटामुळे 2027 मध्ये जागतिक स्मार्टफोन विक्रीत विक्रमी 13.9 टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे.

Smartphone Storage Chips
iPhone Security Warning: iPhone युजर्स सावधान! एका क्लिकमध्ये वैयक्तिक माहिती धोक्यात; Telegram CEO यांनी दिला इशारा

• ग्राहकांसाठी याचा अर्थ काय?

बँक ऑफ अमेरिका आणि TrendForce च्या अंदाजानुसार, 2027 च्या पहिल्या तिमाहीत (Q1 2027) मोबाईल स्टोरेजच्या (NAND) अधिकृत करार दरांमध्ये 5 ते 10 टक्क्यांची घट सुरू होईल. त्यामुळे 2027 च्या मध्यापर्यंत बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोनच्या किमती वाढण्याचं सत्र थांबून ग्राहकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.