Apple प्रेमींसाठी धमाका! iPhone 16 आणि 17 Pro Max वर जबरदस्त डील; किंमती ऐकून व्हाल थक्क

iPhone 16 Offer: टाटा ग्रुपच्या क्रोमा रिटेल चेनने 26 ते 30 नोव्हेंबर 2026 दरम्यान ब्लॅक फ्रायडे सेल सुरू केला आहे. या सेलमध्ये iPhone 16 (128GB) प्रभावी किमतीत 45,490 रुपयांना, तर iPhone 17 Pro Max (256GB) 96,290 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
iPhone 16 Offer
iPhone 16 Offer : (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 
  • iPhone 16 फक्त ₹45,490 मध्ये!

  • iPhone 17 Pro Max ₹96,290 मध्ये!

  • ब्लॅक फ्रायडे सेल 30 नोव्हेंबरपर्यंत!

Croma Black Friday Sale 2026: स्वस्तात iPhone घ्यायचं स्वप्न बघताय का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. क्रोमावर सध्या iPhone 16 फक्त 45,490 रुपयांना मिळतो तर iPhone 17 Pro Max 96,290 रुपयांना खरेदी करता येतो. क्रोमाचा पाच दिवसांचा ब्लॅक फ्रायडे सेल सुरू झाला, त्यामुळे हीच खरी संधी आहे.

• सेल कधीपर्यंत चालणार?

टाटा ग्रुपच्या क्रोमा या मोठ्या रिटेल चेनने आपला 'ब्लॅक फ्रायडे सेल 2026' सुरू केला. 26 नोव्हेंबरला सुरू झालेला हा सेल 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत चालणार असून, देशभरातल्या क्रोमा स्टोअरमध्ये आणि ऑनलाईन दोन्हीकडे ही ऑफर मिळेल. या सेलमध्ये अ‍ॅपलचे आयफोन, मॅकबुक, सॅमसंगचे महागडे फोन, एआय लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीवर भरपूर सूट दिली जाते.

• iPhone आणि मॅकबुकवर किती सूट?

या सेलमध्ये सगळ्यात जास्त फायदा अ‍ॅपलच्या प्रोडक्टवर होतो. बँक कॅशबॅक, जुना फोन दिल्यावर मिळणारं एक्सचेंज व्हॅल्यू आणि त्यावरचा एक्स्ट्रा बोनस, हे सगळं एकत्र केलं तर फोन खूप स्वस्तात पडतो.

iPhone 16 Offer
Vivo X500 सीरिज भारतात दाखल! 200MP कॅमेरा, 7800mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्ले बदलणार यूजर्सचा अनुभव; जाणून घ्या किंमत

1. iPhone 16 - 128GB

याची खरी किंमत 89,900 रुपये आहे. पण जुना आयफोन 14 (128GB) एक्सचेंज केल्यावर 24,000 पर्यंत व्हॅल्यू मिळते. त्यावर 8,000 चा एक्स्ट्रा बोनस आणि 2,000 चा बँक कॅशबॅक वजा केला तर हा फोन फक्त 45,490 रुपयांना पडतो.

2. iPhone 17 Pro Max - 256GB, Orange

1,49,900 रुपयांचा हा टॉप मॉडेल फोन सगळ्या एक्सचेंज ऑफर आणि 4,000 बँक कॅशबॅकनंतर 96,290 रुपयांना मिळतो.

3. MacBook Neo - 8GB + 256GB

79,900 रुपयांचा हा लॅपटॉप जुना इंटेल वाला मॅकबुक एक्सचेंज करून आणि बँक ऑफर लावली तर फक्त 42,714 रुपयांना पडतो.

iPhone 16 Offer
परदेश प्रवासात इंटरनेटचा वापर होणार अधिक सुलभ! WhatsApp लवकरच घेऊन येणार नवीन ट्रॅव्हल ई-सिम फीचर, असं करणार काम

• आयफोन घेताना या 5 गोष्टी नक्की बघा

1. मॉडेल नंबर : Settings > General > About मध्ये जाऊन मॉडेल नंबर बघा. 'M' ने सुरू होत असेल तर फोन अगदी नवीन आहे. 'F' असेल तर तो रिपेअर करून विकलेला आहे. 'N' असेल तर कंपनीने बदलून दिलेला आहे. 'P' असेल तर तो पर्सनलाइज केलेला आहे.

2. सीरियल नंबर आणि वॉरंटी : बॉक्सवरचा आणि फोनमधला सीरियल नंबर एकच आहे का ते बघा. तो नंबर Apple च्या Check Coverage साईटवर टाकून फोन खरा आहे का आणि वॉरंटी कधीपासून सुरू झाली हे तपासा.

3. बॅटरी हेल्थ : Settings > Battery > Battery Health मध्ये जाऊन Maximum Capacity बघा. नवीन फोनची बॅटरी 100% असायला हवी. जुना फोन घेत असाल तर ती 85% पेक्षा जास्त असायला हवी.

4. पार्ट्स हिस्ट्री : Settings > General > About मध्ये 'Parts and Service History' दिसतंय का ते बघा. स्क्रीन, बॅटरी किंवा कॅमेरा बदलला असेल तर तिथे 'Genuine Apple Part' लिहिलेलं असावं. 'Unknown Part' दिसलं तर तो फोन घेऊ नका.

5. ट्रू टोन आणि फेस आयडी : डिस्प्ले बदलला असेल तर बऱ्याचदा True Tone बंद होतं. कंट्रोल सेंटरमध्ये ब्राइटनेस दाबून धरून True Tone दिसतंय का ते बघा. सोबत Face ID व्यवस्थित चालतंय का ते पण चेक करा.

(डिस्क्लेमर : ही माहिती क्रोमा डॉट कॉमवरून घेतली आहे. किंमत आणि ऑफर कंपनीच्या नियमानुसार बदलू शकतात. खरेदी करण्याआधी साईटवरच्या अटी आणि बँक ऑफर स्वतः एकदा तपासून घ्या.)