Huawei Nova Flip अखेर लाँच (फोटो सौजन्य- Huawei )
जगप्रसिध्द टेक कंपनी Huawei ने एक नवीन फ्लिप फोन लाँच केला आहे. Huawei च्या Nova सिरीजमधील Huawei Nova Flip हा पहिला फ्लिप फोन आहे. Huawei Nova Flip चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. पावरफुल बॅटरी, जबरदस्त कॅमेरा आणि धमाकेदार फीचर्ससह कंपनीने हा फोन लाँच केला आहे. Huawei ने Huawei Nova Flip देशांतर्गत बाजारात लाँच केला आहे. Huawei Nova Flip ग्रीन, स्टाररी ब्लॅक, झिरो व्हाईट आणि साकुरा पिंक या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
हेदेखील वाचा- WhatsApp DP सोबत दिसणाऱ्या QR Code चं नक्की काम काय? जाणून घ्या सविस्तर
Huawei Nova Flip मध्ये 6.94 इंचाचा OLED LTPO फोल्डेबल डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 nits रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यासोबतच फोनमध्ये दुसरा 2.15-इंचाचा OLED डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. हा 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनचा लूक अतिशय प्रिमियम आहे.
Huawei Nova Flip मध्ये चांगल्या परफॉर्मन्ससाठी Kirin 8000 चिपसेट बसवण्यात आली आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, Huawei Nova Flip फोनमध्ये 4,400mAh बॅटरी आहे जी 6W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे तुम्ही दिर्घकाळ फोनचा वारप करू शकता. हा स्मार्टफोन HarmonyOS 4.2 वर काम करणार आहे. ज्यामध्ये AI ट्रिक्स, सब्जेक्ट रिमूवल टूल, इमेज ते टेक्स्ट सिलेक्शन, इमेज जनरेशन, अशा प्रकारच्या फीचर्सचा समावेश असणार आहे.
हेदेखील वाचा- माझे वडील क्रूर, माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही; ट्रान्सजेंडर मुलीचा Elon Musk वर पुन्हा गंभीर आरोप
Huawei Nova Flip फोनच्या कव्हर स्क्रीनवर ड्युअल-कॅमेरा युनिट आहे. यात 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 1/1.56-इंच RYYB सेन्सर आणि f/1.9 अपर्चरसह 50MP मुख्य कॅमेरा समाविष्ट आहे. सुरक्षेसाठी यात साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर आहे. कवर डिस्प्ले प्राइमरी कॅमेऱ्यासाठी व्यूफाइंडरवेळी दुप्पट होतो. ज्यामध्ये वेदर, म्यूजिक आणि कॅलेंडर सारखे काही फर्स्ट-पार्टी ॲप वापरले जाऊ शकतात.
Huawei Nova Flip 3 स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12+256GB, 12GB+512GB आणि 1TB असे 3 व्हेरिअंट उपलब्ध आहेत. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर हा फोन तीन प्रकारात सादर करण्यात आला आहे. पहिला व्हेरिअंट 12+256GB ची किंमत 5,288 युआन, म्हणजेच सुमारे 62,200 रुपये आहे. यानंतर, तर दुसरा व्हेरिअंट 12GB+512GB ची किंमत 5,688 युआन, म्हणजेच सुमारे 67,000 रुपये आहे. तर तिसरा 1TB व्हेरिअंट 6,488 युआन म्हणजेच अंदाजे 76,400 रुपयांत लाँच करण्यात आला आहे.
Huawei Nova Flip हा Huawei च्या Nova सिरीजमधील पहिला फ्लिप फोन आहे. पावरफुल बॅटरी, जबरदस्त कॅमेरा आणि धमाकेदार फीचर्ससह Huawei Nova Flip लाँच करण्यात आला आहे. कंपनीने देशांतर्गत बाजारात Huawei Nova Flip फोन लाँच केला आहे. मात्र हा फोन भारतात कधी लाँच होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.