
आजपासून फ्लिपकार्ट नवीन सेल सुरु होत आहे. या सेलचे नाव Mega June Bonanza असे आहे. या सेल अंतर्गत ग्राहकांना दमदार डील्स आणि हैराण करणाऱ्या किंमती प्राप्त होणार आहेत. या सेलची सर्व माहिती तुम्हाला फ्लिपकार्ट ऍपवर मिळेल. दरम्यान ही सेल 13 जूनपासून 19 जूनपर्यंत सुरु असणार आहे. या सेलच्या पोस्टरवर टीव्ही, स्मार्टफोन, एसी आणि फर्निचरला लिस्टेड केलेले दिसत आहे.
फादर्स डे स्पेशल
फ्लिपकार्टची ही सेल अशा वेळेत सुरु झाली याचे मूळ कारण म्हणजे काही दिवसानंतरच 16 जूनला फादर्स डे येणार आहे. या निमित्ताने काही लोक आपल्या वडिलांना या दिवशी काही खास गिफ्ट खरेदी करून देत असतात. त्यामुळेच आता ही सेल अशा ग्राहकांसाठी फार फायद्याची ठरणार आहे.
iPhone 15 वर स्पेशल ऑफर
फ्लिपकार्ट सेलमध्ये iPhone 15 ला लिस्टेड केले गेले आहे. सेलच्या पोस्टरवर असे लिहिण्यात आले आहे की, ही आतापर्यंतची सर्वात कमी किंमत असणार आहे. मात्र ही किंमत नक्की किती असणार आहे याबद्दल कोणतेही डिटेल्स पुरवलेले नाही. यात Dynamic Island आणि 48MP चा कॅमेरा देण्यात आलेला आहे. तसेच यात अजूनही काही धमाकेदार फीचर्स देण्यात आलेले आहेत.
[read_also content=”येतोय जमिनीवर चालणारा स्मार्टफोन! कंपनीने दिले चाक, नक्की कारण काय जाणून घ्या https://www.navarashtra.com/technology/cmf-phone-1-soon-to-be-launched-in-india-with-wheel-547163.html”]
स्मार्टफोन्सवर 40% डिस्काउंट
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये ग्राहकांना सर्व स्मार्टफोन्सवर 40% पर्यंतचा डिस्काउंट देण्यात येणार आहे. ही माहिती फ्लिपकार्टवर लिस्टेड करण्यात आली आहे. या सेल दरम्यान, तुम्हाला सॅमसंग, रेडमी, विवो आणि वनप्लससह अनेक प्रोडक्टस स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर इतर ब्रँड्सचेही स्मार्टफोन्स तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येणार आहेत.
टीव्ही आणि एसीवर स्पेशल सूट
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये टीव्ही आणि विविध अप्लायन्सेसवरही स्पेशल डिस्काउंट देण्यात आला आहे. सेल बॅनरवर लिस्टेड डिटेल्समध्ये सांगण्यात आले आहे की, इथे टीव्ही, एसी, पंखे आणि एअर कूलर स्वस्त दरात मिळू शकते. टीव्हीवर इथे 55-70 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते, तर एसची सुरुवातीची किंमत 26,490 रुपये इतकी आहे. याव्यतिरिक्त फॅशन आणि लाइफस्टाइल कॅटेगरीमध्येही स्पेशल डील्स उपलब्ध आहेत.