20 सप्टेंबरपासून 'या' लोकांचे Gmail अकाऊंट होणार बंद! तुमचं अकाऊंट तर नाही ना, जाणून घ्या (फोटो सौजन्य - pinterest)
हल्ली प्रत्येकजण त्यांच्या कामासाठी Gmail चा वापर करतात. पर्सनल असो किंवा प्रोफेशनल आपली अनेक कामं Gmail च्या मदतीने अगदी सहज शक्य होतात. Gmail येणारे नवनवीन फीचर्स युजर्सची काम देखील सोपी करत आहेत. आजच्या स्मार्टफोन आणि डिजीटल युगात जवळपास प्रत्येकाकडे Google वर Gmail आयडी असतो. आपल्याला अनेक अॅप्समध्ये देखील Gmail लॉगइन करावा लागतो.
हेदेखील वाचा- Jio network down: Jio चं नेटवर्क डाऊन, युजर्सना करावा लागतोय समस्यांचा सामना
रोजच्या वापरातील असणारा Gmail बरेच लोकं अॅक्टिव्ह ठेवतात तर काही जण तो तसाच सोडून देतात. या सगळ्यामुळे आता Google ने एक मोठा निर्णय घेतला आहे. Google ने जे Gmail आयडी अॅक्टिव्ह नाहीत, असे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Google च्या या निर्णयाचा अनेक युजर्सवर परिणाम होणार आहे. Google 20 सप्टेंबरपासून अनेक Gmail अकाऊंट बंद करणार आहे. तुम्ही देखील तुमचं अकाऊंट अॅक्टिव्ह ठेवलं नसेल, तर कंपनी तुमचं अकाऊंट देखील बंद करू शकते.
Google सतत लोकांना त्यांचे अकाऊंट अॅक्टिव्ह ठेवण्यास सांगत असते. मात्र आता ज्या युजर्सनी Gmail अकाऊंट (Gmail आयडी) ॲक्टिव्ह ठेवले नाही त्यांची खाती Google बंद करणार आहे. पण काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे Gmail अकाउंट बंद होण्यापासून वाचवू शकता. Google त्याच्या सर्व्हरची जागा मोकळी करण्यासाठी अनेक पावलं उचलत आहे, अशा परिस्थितीत ज्या लोकांनी Gmail किंवा Google Drive सारख्या सेवा वापरल्या आहेत परंतु बऱ्याच काळापासून सक्रिय नाहीत, असे अकाऊंट Google बंद करणार आहे. तर Google नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या अकाऊंटवर देखील लक्ष केंद्रित करू इच्छित आहे.
हेदेखील वाचा- HMD Skyline स्मार्टफोन भारतात झाला लाँच! बिघडलेला फोन स्वत: करू शकाल दुरुस्त, आज होणार पहिली विक्री
जवळपास 2 वर्षांपासून अॅक्टिव्ह नसलेले अकाऊंट बंद करण्याचा निर्णय Google ने घेतला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही गेल्या दोन वर्षांपासून Gmail अकाऊंट वापरले नसेल तर तुमचे खातेही बंद होऊ शकते. Google निष्क्रिय धोरणांतर्गत, Google ला दोन वर्षांसाठी निष्क्रिय Google अकाऊंट हटविण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत आता तुम्हाला तुमचं Gmail अकाऊंट सेव्ह करायचं असेल तर तुम्ही काही सोप्या टीप्स फॉलो करू शकता.