Google ने जारी केला अलर्ट (फोटो सौजन्य - pinterest)
देशात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. स्कॅमर्स बनावट ईमेल आणि बनावट मॅसेज पाठवून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. स्कॅमर्सच्या बनावट ईमेल आणि बनावट मॅसेजना काही नागरिक बळी पडतात, ज्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होतं. काही दिवसांपूर्वीच मायक्रोसॉफ्ट डाऊनची समस्या निर्माण झाली होती. या समस्येनंतर मायक्रोसॉफ्टने अलर्ट जारी करत सांगितलं होतं की, क्राउडस्ट्राइक सारखे आउटेज पुन्हा होण्याची शक्यता आहे. यानंतर आता सर्वात मोठी टेक कंपनी Google ने देखील त्यांच्या युजर्ससाठी अलर्ट जारी केला आहे. स्कमॅर्स आणि फिशिंगच्या वाढत्या घटना लक्षात घेता युजर्सनी सावध राहावं, अशा सूचना Google ने दिल्या आहेत.
हेदेखील वाचा- Google ची एक चूक युजर्सना पडली महागात; 1.5 करोड लोकांचे पासवर्ड धोक्यात
Google च्या थ्रेट ॲनालिसिस ग्रुप (TAG) ने हा अहवाल सादर केला आहे. Google च्या थ्रेट ॲनालिसिस ग्रुप (TAG) ने अहवाल दिला आहे की इराण सरकारकडून समर्थित फिशिंग मोहिमांमध्ये वाढ झाली आहे. या ग्रुपचे नाव APT42 आहे. इराणची APT42 इस्रायल आणि अमेरिकेतील हाय-प्रोफाइल वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहे. प्रभावित झालेल्यांमध्ये सध्याचे आणि भूतकाळातील सरकारी अधिकारी, राजकीय मोहिमांमध्ये काम करणारे लोक आणि मुत्सद्देगिरीचा समावेश आहे.
एवढेच नव्हे तर एनजीओ आणि शैक्षणिक संस्थाही त्यांचे लक्ष्य आहेत. कारण ते परराष्ट्र धोरणात योगदान देतात. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत APT42 मुळे अमेरिका आणि इस्रायलमधील 60 टक्के लोक प्रभावित झाले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येक युजरने काळजी घेणं गरजेचं आहे.
हेदेखील वाचा- अनेक नवीन फीचर्ससह RRTS Connect App झाला अपडेट; आता प्रवास होणार अधिक सोयीस्कर
Google ने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, APT42 ईमेल फिशिंग हल्ल्यांमध्ये विविध युक्त्या वापरत आहे. हा सायबर गुन्ह्याचा एक प्रकार आहे. यामध्ये गुन्हेगार युजर्सना युजर नेम आणि पासवर्डसारखी माहिती शेअर करण्यास सांगतात. अशा प्रकारे APT42 त्याचे फिशिंग हल्ले करते. या पद्धतीत, स्कॅमर युजर्सना असे ईमेल पाठवतात ज्यात सरकारी संस्थांसारख्या वैध संस्थांची नावे असतात. याशिवाय ते यासाठी एक बनावट वेबसाइट देखील तयार करतात. यानंतर, हा खरा ईमेल मानून, लोकांना अज्ञात लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. अशा परिस्थितीत Google ने लोकांना सावध राहण्यास सांगितले आहे. तसेच कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नये, अशा सूचनाा देखील Google ने युजर्ससाठी दिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट डाऊनची समस्या निर्माण झाली होती. या दिवशी कंपनीला सर्वात मोठ्या आउटेजचा सामना करावा लागला होता. ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला होता. जगभरातील अनेक कामं ठप्प झाली होती. विमान कंपन्या, दवाखाने, कॉर्पोरेट ऑफीस, अशा अनेक ठिाकाणांची कामं ठप्प झाली होती.
मायक्रोसॉफ्ट डाऊनचा परिणाम रेल्वे नेटवर्कवर देखील झाला होता. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्ट डाऊनचा संपूर्ण दोष CrowdStrike ला दिला होता. या समस्येनंतर मायक्रोसॉफ्टने अलर्ट जारी करत सांगितलं होतं की, क्राउडस्ट्राइक सारखे आउटेज पुन्हा होण्याची शक्यता आहे. यानंतर आता सर्वात मोठी टेक कंपनी Google ने देखील त्यांच्या युजर्ससाठी अलर्ट जारी केला आहे.