
मुंबई : मुंबईत नुकतेच HMD ग्लोबलकडून नोकिया जी-४२ फायजी, (Nokia G42 5G) मोबाईलचे अनावरण (लॉन्च) करण्यात आले. दरम्यान, या मोबाईलची खास वैशिष्टये म्हणजे टिकाऊपणा, सुंदर व आकर्षक डिस्पले आणि अत्याधुनिक फिचर व तंत्रज्ञान यामुळं हा मोबाईल ग्राहकांच्या पसंतीत उतरेल, असा विश्वास रवी कुंवर, उपाध्यक्ष यांनी व्यक्त केला आहे. हा मोबाईल Amazon वर देखील विक्रिसाठी फक्त 12,599/- एवढ्या किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळं नोकिया जी-४२ फायजी (Nokia G42 5G) हा मोबाईल विक्रिसाठी बाजारात उपलब्ध असून, अगदी माफक दरात असलेल्या या मोबाईलचा वापर ग्राहकांनी करण्यास हरकत नाही.
काय आहेत वैशिष्टये…
दरम्यान, Nokia G42 5G या मोबाईलमध्ये अत्याधुनिक फिचर आहेत. त्यामुळं याचा सहज व सोप्या पद्धतीने ग्राहक वापर करु शकतात. यामध्ये खास व अनेक महत्वपूर्ण वैशिष्टये आहेत. नोकिया G42 5G स्नॅपड्रॅगन 480 प्लस 5G चिपसेट, 11GB RAM, तसेच तीन दिवसांची बॅटरी बॅकअप साठवण्याची क्षमता आणि 2-वर्षांच्या OS अपग्रेडसह सुपर-फास्ट 5G क्षमता या मोबाईलमध्ये आहे. Android-13 वर दोन वर्षांच्या गॅरंटीड OS अपग्रेड्ससह अनेक महत्त्वाची वैशिष्टये व फिचर्स आहेत. तसेच विशेष म्हणजे हा मोबाईल टिकाऊ आहे.
तीन दिवसांची बॅटरी बॅकअप…
नवीन स्मार्टफोनमध्ये तीन दिवसांची बॅटरी लाइफ आहे, Nokia G42 5G 11/128GB कॉन्फिगरेशन (6GB फिजिकल रॅम + 5GB व्हर्च्युअल रॅम), 6.56HD+ 90 Hz कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 मध्ये 450 nits च्या ब्राइटनेससह येतो. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी यात 50MP AF मुख्य कॅमेरा, तसेच अतिरिक्त 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ कॅमेरे, सर्व LED फ्लॅशसह समाविष्ट आहेत. तसेच 8MP कॅमेरासह उत्तम सेल्फीची देखील मोबाईलमध्ये व्यवस्था आहे.
नोकिया G42 5G भारतीय बाजारपेठेत आणताना, आम्हाला कमालीचा अभिमान वाटतो, टिकावूपणा, दीर्घायुष्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार हा मोबाईल नक्कीच ग्राहकांना आवडेल. तसेच शाश्वत आणि दर्जेदार निवडी सर्वांना उपलब्ध करून देण्याची आमची वचनबद्धता आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. यात स्टोरेजचा वापर ऑप्टिमाइझ केला आहे आणि याची खात्री केली आहे. की यात वेळोवळी अपडेट्स करु शकता. टिकाऊ व जास्तीत जास्त काळ हा मोबाईल वापरता यावा, यासाठी कंपनी वचनबद्ध आहे. असं देखील कंपनीनं म्हटलं आहे.