स्मार्टफोन हा आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. रोजच्या कामात आपल्याला या स्मार्टफोनची फार मदत होत असते. अनेकदा अतिरिक्त ॲप्समुळे कोणते नवीन ॲप डाउनलोड करायचे म्हटले की, आपल्याला जुने ॲप्स डिलीट करावे लागतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही एका मोबाइल ॲपवरून एकूण तीन मोबाइल ॲप्स ऍक्सेस करू शकता. तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. जर तुम्ही मेटाचे लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप वापरत असाल तर तुम्हाला ॲपच्या या खास वैशिष्ट्याची माहिती असणे आवश्यक आहे. या ॲपच्या मदतीने तुमच्या फोनमधील अतिरिक्त ॲप्सची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.
आपल्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सॲप हे ॲप आता एक सामान्य ॲप झाले आहे. प्रत्येकाच्या फोनमध्ये हे ॲप प्रामुख्याने पाहायला मिळते. तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवरून इंस्टाग्राम आणि फेसबुक ओपन शकता. म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्राम उघडण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपवरून परत जाण्याची आणि फोनवर इतर ॲप्स उघडण्याची गरज नाही. होय, जर तुम्ही व्हॉट्सॲपसह फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्स असाल, तर हे फिचर तुमच्यासाठी अनेक प्रसंगी उपयुक्त ठरू शकते.
हेदेखील वाचा – Google One Lite: आता अतिरिक्त डेटा डिलिट करण्याची गरज नाही गुगल फ्रीमध्ये देत आहे 15GB स्टोरेज
वास्तविक, मेटा ही व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुक या तिन्ही ॲप्सची मूळ कंपनी आहे. अशा परिस्थितीत, मेटा आपल्या वेगवेगळ्या ॲप्ससह मोठ्या युजर्ससाठी विशेष फीचर्स ऑफर करत आहे. व्हॉट्सॲपसह इन्स्टाग्राम आणि फेसबुक वापरणाऱ्या मोबाइल युजर्ससाठी ॲपचा प्रवेश सुलभ करण्यासाठी हे फिचर सुरू करण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – या देशांमध्ये भारतापेक्षा स्वस्त आहे iPhone 16 सिरीज, 44000 रुपयांपर्यंत कमी आहे किंमत