तुमचा स्मार्टफोन चार्जर खरा आहे खोटा? सरकारी ॲपच्या मदतीने क्षणार्धात शोधून काढा
सध्या डिजिटल युग सुरू आहे. या डिजिटल काळात प्रत्येक कामासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक गॅझेटची गरज भासते. आजच्या काळात आपण आपली अनेक कामे आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने करत असतो. स्मार्टफोन आणि लॅपटॉप चार्ज करण्यासाठी चार्जर हे सर्वात आवश्यक गॅझेट आहे. आता स्वस्ताईच्या नादात तुम्ही बनावट चार्जर विकत घेऊन घरी आणले तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
लॅपटॉप आणि स्मार्टफोनसारख्या महागड्या उपकरणांची बॅटरी खराब होऊ शकते. फोनची बॅटरी जास्त गरम होण्यासारख्या समस्या यामुळे निर्माण होऊ शकतात. असे झाल्यास फोनची बॅटरी फुटण्याची शक्यताही वाढते. इलेक्ट्रॉनिक गॅझेट चार्ज करण्यासाठी या सर्वात महत्त्वाचा गॅझेट म्हणजे तुमचा चार्जर खरा आहे की बनावटी शोधून काढण्यासाठी तुम्ही काही टिप्सचा वापर करू शकता.
हेदेखील वाचा – BSNL ने वाढवले Jio-Airtel-Vi चे टेन्शन! स्वस्त केले हे तीन प्लॅन
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या BIS CARE या अधिकृत ॲपद्वारे तुम्ही चार्जर खरा आहे की नाही हे शोधू शकता. हे ॲप तुम्ही तुमच्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.
BIS केअर स्वस्तपणाच्या शोधात तुम्ही बनावट चार्जर विकत घेऊन घरी आणलात तर मोठी समस्या उद्भवू शकते. लॅपटॉप आणि स्मार्टफोनसारख्या महागड्या उपकरणांची बॅटरी खराब होऊ शकते. फोनच्या बॅटरीमध्ये जास्त गरम होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. असे झाल्यास फोनची बॅटरी फुटण्याची शक्यताही वाढते.
आता BIS केअर ॲप कसे वापरायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फोनवर एक ॲप इन्स्टॉल कराव लागेल. यांनतर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा
हेदेखील वाचा – वॉशरूम किंवा चेंजिंग रूममध्ये हिडन कॅमेरा तर नाही? अशाप्रकारे शोधून काढा घ्या
तुम्ही चार्जरवर उत्पादन नोंदणी क्रमांक R-XXXXXXXXX फॉरमॅटमध्ये तपासू शकता. जर तुम्हाला हा नंबर सापडत नसेल तर तुम्ही प्रोडक्टसवर बनलेला QR कोड स्कॅन करू शकता. तपशील एंटर केल्यानंतर, तुम्हाला फोन स्क्रीनवर चार्जरशी संबंधित सर्व माहिती दिसेल. या तपशीलांमध्ये तुम्ही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरचे नाव, देश, उत्पादन कॅटेगरी , नाव, भारतीय मानक क्रमांक, मॉडेल तपासू शकता.