आधार कार्डसोबत लिंक केलेला मोबाईल नंबर विसरलात? मग चिंता सोडा, या ट्रिकने काही मिनिटांतच शोधून काढा
आज आधार कार्ड हे अनेक लोकांचे ओळखपत्र बनले आहे. आजच्या या डिजिटल युगात आधार कार्ड सर्वांसाठी एक गरजेचे दस्तऐवज बनले आहे. अशा स्थितीत मोबाईल नंबर आधार कार्डमध्ये लिंक करणे महत्त्वाचे मानले जाते ज्यामुळे तुम्हाला मोबाईलवर सर्व अपडेट मिळत राहावेत. पण अनेक वेळा वेगवेगळे मोबाईल नंबर वापरताना लोक हे विसरतात की त्यांनी कोणता नंबर आधारशी लिंक केला होता. तुमच्यासोबतही असे काही झाले असेल तर आता चिंता सोडा. आज आम्ही तुम्हाला एका सोप्या ट्रिकबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर सहज शोधू शकता. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही घरबसल्या काही सेकंदातच आधार कार्ड सोबत नक्की कोणता मोबाईल नंबर लिंक हे ते शोधू शकता.
आम्ही तुम्हाला सांगतो की, UIDAI ही एक अधिकृत वेबसाइट आहे जी तुम्हाला आधारशी संबंधित कामे करण्यात मदत करते. आधारमधील लिंक क्रमांक जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर आता तुम्हाला वरच्या बारमध्ये My Aadhaar वर जाऊन त्यावर क्लिक करावे लागेल.
हेदेखील वाचा – Jio-Airtel-Vi-BSNL युजर्सने लक्ष द्या! संपूर्ण जगाला मागे सारत सरकार आणत आहे 6G इंटरनेट
येथे तुम्हाला आधार सेवा दिसेल, ज्याच्या खाली Verify Email/Mobile क्रमांक लिहिलेला असेल, तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि कॅप्चा अचूक भरा आणि सबमिट करा. सबमिट वर क्लिक करताच आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरची माहिती तुमच्या समोर येईल.
हेदेखील वाचा – 4G सोडा आता BSNL युजर्सना लवकरच 5G सर्व्हिस मिळणार, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितली डेट
आम्ही तुम्हाला सांगतो की, कधी-कधी तुम्हाला दिसेल की तुम्ही एंटर केलेला नंबर आधीच व्हेरिफाय आहे (The mobile number you have entered is already verified with our records). यानंतर, आधारशी लिंक नसलेला मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर (The mobile number you have entered does not match with our records) असा मेसेज दिसेल. असे केल्याने तुम्ही वेगवेगळे नंबर टाकू शकता आणि कोणता मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे आणि कोणता नाही हे शोधू शकता.