आता विना इंटरनेट करता येईल UPI पेमेंट, फक्त हा सिक्रेट कोड लक्षात ठेवा
UPI सेवा 2016 मध्ये भारतात सुरू झाली. त्यानंतर भारताने मागे वळून पाहिलेच नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या NPCI अहवालानुसार, UPI पेमेंटच्या बाबतीत भारताने चीन आणि अमेरिका सारख्या देशांना खूप मागे सोडले आहे. भारताच्या UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेसने चीनच्या Alipay आणि अमेरिकेच्या PayPal ला मागे टाकून एक नवीन विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे. भारताने 2023 मध्ये प्रति सेकंद 3,729 UPI ट्रांजॅक्शन नवा रेकॉर्ड बनवला आहे.
UPI पेमेंट करताना अनेक वेळा युजर्सना खराब इंटरनेटचा सामना करावा लागतो. यासाठी NPCI ने नुकतीच इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली आहे. याद्वारे जरी तुम्ही कुठेतरी असाल जेथे इंटरनेट सुविधा नाही किंवा तुमचा मोबाइल डेटा संपला आहे, तरीही इंटरनेटशिवाय तुम्ही तुमच्या फोनवरून UPI पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला एक सिक्रेट कोड लक्षात ठेवावा लागेल आणि काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
हेदेखील वाचा – तुमचा स्मार्टफोन चार्जर खरा आहे खोटा? सरकारी ॲपच्या मदतीने क्षणार्धात शोधून काढा
UPI पेमेंट सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक इत्यादी बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि बँक खाते UPI आयडी तयार करण्यासाठी वापरावे. तुमचा मोबाईल नंबर UPI खात्याशी लिंक असेल तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. तुमचा मोबाईल नंबर वापरून UPI आयडी तयार करण्यासाठी तुम्ही कोणतेही पेमेंट ॲप किंवा BHIM UPI ॲप वापरू शकता. UPI आयडी तयार केल्यानंतर, तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन UPI पेमेंट सुविधेचा लाभ घेऊ शकता.
हेदेखील वाचा – BSNL ने वाढवले Jio-Airtel-Vi चे टेन्शन! स्वस्त केले हे तीन प्लॅन