AI फीचर्ससह लाँच झाला Infinix Zero 40 5G, वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि 50MP अल्ट्रावाइड कॅमेऱ्याने सुसज्ज (फोटो सौजन्य - Infinix )
भारतातील लोकप्रिय कंपन्यांपैकी एक असणाऱ्या Infinix ने आज त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Infinix ने आज भारतात Infinix Zero 40 5G लाँच केला आहे. आज दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. हा ईव्हेंट कंपनीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर लाईव्ह सुरु होता. यामध्ये ग्राहकांना उत्कृष्ट प्रदर्शन अनुभवासाठी 3D कर्व्ह AMOLED डिस्प्ले, परफॉर्मन्ससाठी डायमेन्सिटी 8200 अल्टीमेट चिपसेट, 12 GB रॅम, 50MP फ्रंट आणि 108MP रिअर कॅमेरा विशेष फोटोग्राफी अनुभवासाठी अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
हेदेखील वाचा- 20 सप्टेंबरपासून ‘या’ लोकांचे Gmail अकाऊंट होणार बंद! तुमचं अकाऊंट तर नाही ना, जाणून घ्या
तुम्ही फ्लिपकार्टवरून ह्या स्मार्टफोनची खरेदी करू शकता. Zero 40 5G ची विक्री 21 सप्टेंबरपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि इतर रिटेल आउटलेटवर सुरू होईल. Infinix Zero 40 5G स्मार्टफोन मूव्हिंग टायटॅनियम, रॉक ब्लॅक आणि व्हायलेट गार्डन अशा तीन रंगात लाँच करण्यात आला आहे.
Infinix Zero 40 5G मध्ये, 6.78 इंचाच्या 3D वक्र AMOLED डिस्प्लेसह सर्वोत्तम 144Hz रीफ्रेश रेट, 1300 nits पीक ब्राइटनेस, 1500Hz टच सॅम्पलिंग रेट उपलब्ध आहे. इतकंच नाही तर सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आणि TUV राईनलँड आय-केअर मोड सर्टिफिकेशनही देण्यात आलं आहे.
Infinix Zero 40 5G मध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसर स्थापित करण्यात आला आहे. हा आर्म कॉर्टेक्स-ए78 कोर असलेला ऑक्टा-कोर CPU आहे. जे 3.1 GHz पर्यंत क्लॉक स्पीड देऊ शकते. हे 4nm प्रक्रियेवर तयार केले जाते.
Infinix Zero 40 5G 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. यासोबतच एक्सटेंडेड रॅम तंत्रज्ञानही दिले जात आहे. ते तुमच्या मोबाईलची भौतिक मेमरी रॅमच्या रूपात बदलते.
हेदेखील वाचा- Motorola edge50 Neo भारतात लाँच! मिळणार सुपर एचडी LTPO डिस्प्ले आणि बरंच काही, किंमत तर केवळ इतकी
फोटोग्राफीसाठी, Infinix Zero 40 5G मधील मागील कॅमेरा सेटअप LED फ्लॅशसह प्रदान करण्यात आला आहे. ज्यामध्ये OIS तंत्रज्ञानासह 108MP प्राथमिक कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP कॅमेरा लेन्स बसवण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, सेल्फी प्रेमींसाठी विशेष 50MP अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यासोबत ग्राहकांना अनेक AI फीचर्सही मिळतील.
Infinix Zero 40 5G डिव्हाइसमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. एवढेच नाही तर हा फोन 20W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. याचा अर्थ असा की तुम्ही दीर्घ बॅकअपसह फोन लवकर चार्ज करू शकाल.
Infinix Zero 40 5G मध्ये स्मार्ट AI फीचर्स देण्यात आले आहे. ज्यामध्ये AI इरेजर, AI वॉलपेपर, AI कट-आउट स्टिकर फीचर, AI व्लॉग, AI इमेज जनरेटर, AI ट्रान्सलेट आणि कंटेंट तयार करण्यासाठी AI टेक्स्ट जनरेटर यांसारखी अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध असतील.
ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, Infinix Zero 40 5G स्मार्टफोन Android 14 वर आधारित आहे. यासह, ग्राहकांना 2 वर्षांचे सॉफ्टवेअर अद्यतने आणि 36 महिने म्हणजेच 3 वर्षांचे सुरक्षा अद्यतने मिळतील.
Infinix Zero 40 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम 5G, 4G, ब्लूटूथ, Wi-Fi 6e, डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, IR ब्लास्टर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, स्टिरीओ स्पीकर असे अनेक पर्याय देण्यात आले आहेत.
12 जीबी रॅम + 256 जीबी मेमरीसह Infinix Zero 40 5G ची किंमत 27,999 रुपये आहे. तर मोठ्या मॉडेल 12 GB RAM + 512 GB ची किंमत 30,999 रुपये आहे. लॉन्च ऑफर अंतर्गत, कंपनी निवडक बँकांवर 3,000 रुपयांची सूट देईल. यानंतर, बेस मॉडेल 24,999 रुपयांना आणि टॉप मॉडेल 27,999 रुपयांना उपलब्ध होईल.