इंस्टाग्रामने 18 वर्षांखालील युजर्ससाठी बदलले नियम, पालक नियंत्रित करणार अकाऊंट (फोटो सौजन्य - pinterest)
लोकप्रिय सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम नेहमीच त्यांच्या युजर्ससाठी नवीन अपडेट घेऊन येत असते. सध्या इंस्टाग्राम प्रत्येक वयाच्या युजर्ससाठी नवीन अपडेट आणण्याचा प्रयत्न करत आहे. कारण इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या काही रिल्स लहान मुलं पाहू शकत नाहीत. कारण त्यांनी अशा प्रक्रारचे व्हिडीओ किंवा रिल्स पाहिल्यास त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. याच सर्व गोष्टी लक्षात घेत आता इंस्टाग्रामने एक नवीन अपडेट आणलं आहे. हे अपडेट सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वापरत असलेल्या 18 वर्षांखालील युजर्स आणि त्यांच्या पालकांसाठी असणार आहे.
हेदेखील वाचा- China Black Myth video game: चीनचा वुकाँग गेम भारताच्या जोरावर होतोय लोकप्रिय, काय आहे कनेक्शन? वाचून बसेल धक्का
आता 18 वर्षांखालील इंस्टाग्राम युजर्सचे अकाऊंट त्यांचे पालक नियंत्रित करू शकणार आहे. हे नविन अपडेट मुलं आणि पालकं दोघांसाठी फायदेशीर ठरणार आहे. 18 वर्षांखालील युजर्ससाठी प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित करण्यासाठी Instagram सतत नवीन फीचर्स जोडत आहे. 18 वर्षांखालील कोणत्याही किशोरवयीन मुलाने जो सोशल मिडीया प्लॅटफॉर्म Instagram वर अकाऊंट तयार करतो त्याला किशोर खात्यासाठी साइन अप करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये पालक नियंत्रणे असतील. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये मंगळवारी त्याची सुरुवात झाली.
हेदेखील वाचा- 20 सप्टेंबरपासून ‘या’ लोकांचे Gmail अकाऊंट होणार बंद! तुमचं अकाऊंट तर नाही ना, जाणून घ्या
18 वर्षांखालील युजर्ससाठी प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित करण्यासाठी Instagram सतत नवीन फीचर्स जोडत आहे. आता किशोरवयीनांच्या सुरक्षेसाठी मेटाने नवीन प्रकारचे अकाऊंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 18 वर्षांखालील कोणत्याही किशोरवयीन व्यक्तीने जो Instagram वर खाते तयार करतो त्याला किशोर खात्यासाठी साइन अप करणे आवश्यक आहे, जिथे पालकांचे नियंत्रण असते. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये मंगळवारी त्याची सुरुवात झाली. लवकरच भारतात देखील याची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या 18 वर्षांखालील Instagram वापरकर्त्यांची खाती आपोआप नवीन प्रकारच्या किशोरवयीन खात्यात रूपांतरित होतील, ज्यात कठोर गोपनीयता सेटिंग्ज समाविष्ट आहेत. अशा खात्यातून अज्ञात खात्याला संदेश पाठवणे कठीण होईल आणि त्यावरील संवेदनशील मजकूर देखील मोठ्या प्रमाणात मर्यादित असेल. किशोरवयीन वापरकर्त्यांना आता खाते सेटिंग्जमध्ये बदल करण्यासाठी त्यांच्या पालकांच्या परवानगीची आवश्यकता असेल. थोडक्यात किशोरवयीन मुलांचे इंस्टाग्राम अकाऊंट आता त्यांचे पालक नियंत्रित करणार आहेत.
जेव्हा किशोरवयीन मुलांचे पालक Instagram चे पर्यवेक्षण साधन सेट करतात, तेव्हा ते त्यांची मुले कोणत्या खात्यांशी संदेशांमध्ये संवाद साधत आहेत हे पाहण्यास सक्षम असतील. तथापि, त्यांना संदेशातील मजकूर पाहण्याची परवानगी दिली जाणार नाही. यामुळे मुलांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल. तसेच अज्ञात संदेशांपासून देखील पालक मुलांचे रक्षण करू शकतील. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये मंगळवारी त्याची सुरुवात झाली. वकरच भारतात देखील याची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंस्टाग्राम त्याच्या युजर्सच्या सुरक्षेची काळजी घेताना दिसत आहे.