Instagram ने लाँच केलं नवीन फीचर, प्रोफाईल होणार आणखी मजेदार! (फोटो सौजन्य - pinterest)
लोकप्रिय सोशल मिडीया प्लॅटफॉर्म Instagram लवकरच त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन अपडेट लाँच करणार आहे. हे नवीन अपडेट खास Instagram युजर्सच्या प्रोफाईलशी संबंधित असणार आहे. हे अपडेट लाँच झाल्यानंतर Instagram युजर्स त्यांच्या प्रोफाईलमध्ये म्युझिक ॲड करण्यास सक्षम असतील. एकदा तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये म्युझिक ॲड केलं की त्यानंतर जोपर्यंत तुम्ही हे म्युझिक स्वत: हटवत नाही किंवा बदलत नाही तोपर्यंत ते म्युझिक काढले जाणार नाही. याबाबत कंपनीने माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा- Instagram युजर्ससाठी लाँच झालं नवीन अपडेट! आता एकाच वेळी 20 फोटो-व्हिडिओ शेअर करू शकणार
कंपनीने म्हटलं आहे की, कंपनीने आपल्या अंदाजे 240 कोटी वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. आता सर्व युजर्स त्यांच्या प्रोफाइलमध्ये 30 सेकंदांचे म्युझिक ॲड करण्यास सक्षम असतील. एकदा म्युझिक ॲड केल्यानंतर, युजर्सने ते काढून टाकल्याशिवाय किंवा बदलल्याशिवाय ते म्युझिक काढले जाणार नाही. हे वैशिष्ट्य क्रिएटर्स आणि प्रोफाइल दोन्हीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही काही सोप्या स्टेप्सचा वापर करून तुमच्या प्रोफाईलमध्ये म्युझिक ॲड करू शकता. एकदा तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये म्युझिक ॲड केलं की त्यानंतर जोपर्यंत तुम्ही हे म्युझिक स्वत: हटवत नाही किंवा बदलत नाही तोपर्यंत ते म्युझिक काढले जाणार नाही. याबाबत कंपनीने माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा- WhatsApp युजर्ससाठी खुशखबर! Instagram चं भन्नाट फीचर आता WhatsApp वर येतंय
याशिवाय Instagram ने नुकतीच आणखी दोन फीचर्स लाँच केले आहेत. त्यातील एक फीचर म्हणजे, आता युजर्स Instagram वर एकाच वेळी 20 फोटो-व्हिडिओ शेअर करू शकणार आहेत. यापूर्वी Instagram वर युजर्स एकाच वेळी 10 फोटो-व्हिडिओ शेअर करू शकत होते. मात्र आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. ज्या युजर्सना Instagram वर कॅरोसेल पोस्ट शेअर करायला आवडतात, त्यांच्यासाठी हे नवीन फीचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. Instagram ने अलीकडेच रीलमध्ये एकाच वेळी 20 गाणी जोडण्याचे फीचर लाँच केले होते. कंपनीने स्टिकरमध्ये संगीत जोडण्याचा पर्यायही दिला आहे.
याशिवाय, प्रोफाइलवर उपस्थित असलेल्या ग्रिडमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. इंस्टाग्रामवर दिसणारे स्क्वेअर ग्रिड येत्या काही दिवसांत बदलू शकते. याबाबत देखील कंपनीने माहिती दिली आहे. सध्या, इंस्टाग्राम खात्यावरील फोटो चौरस ग्रिडमध्ये दिसतात. पण येत्या काही दिवसांत व्हर्टिकल प्रोफाईल ग्रिड लाँच केलं जाईल.