ॲपलला मोठा धक्का! या देशात iPhone 16 वर बंदी, सरकारने केली मोठी कारवाई, धक्कादायक कारण आले समोर
नुकतेच काही महिन्यांपूर्वी ॲपलने आपली बहुचर्चित iPhone 16 सिरीज लाँच केली. भारतासह अनेक देशात आयफोनचे चाहते आहेत. iPhone 16 लाँच होताच युजर्सने याला उत्तम प्रतिसाद दर्शवला. त्यातच आता आयफोन 16 बाबत एक नवीन बातमी समोर आली आहे. यानुसार या स्मार्टफोनला आता एका देशात चक्क बॅन करण्यात आले आहे. असे का झाले? आणि हा देश नक्की कोणता आहे? याविषयी काही सविस्तर बाबी जाणून घेऊयात.
ॲपल iPhone 16 सिरीज नुकतीच बाजारात दाखल झाली. मात्र , एक देश आहे ज्याने यावर बंदी घातली आहे. तसेच, त्या देशात सध्या असलेला iPhone 16 बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. इंडोनेशियाने iPhone 16 ची विक्री तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, हा निर्णय ॲपलवर होणाऱ्या कठोर कारवाईचा एक भाग आहे. ॲपलने आपल्या देशात गुंतवणूक करण्यास सांगितले होते, असा आरोप इंडोनेशियन सरकारने केला आहे. परंतु कंपनी तसे करण्यास असमर्थ असल्याचे सिद्ध झाले आहे.
ॲपलने इंडोनेशियन सरकारला गुंतवणूक करण्यास सांगितले होते. यानंतर कंपनीने काही गुंतवणूक देखील केली होती, परंतु कंपनीने जेवढे सांगितले होते तेवढे झाले नाही. आता TKDN सर्टिफिकेशन सरकारने जारी केले गेले नाही. असे होत नसल्याने इंडोनेशियामध्ये Apple iPhone 16’ची विक्री आता होणार नाही. इंडोनेशिया सरकारकडून उर्वरित गुंतवणुकीची प्रतीक्षा केली जात आहे.
हेदेखील वाचा – या दिवाळीत रेल्वेच्या तिकीटाच्या रकमेत फ्लाइटने घरी पोहोचा, Google’चे हे फिचर करेल मदत
ॲपलने आतापर्यंत 1.48 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर ॲपलने एकूण 1.71 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे. अशा स्थितीत कंपनीने आपले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे इंडोनेशियन सरकारने कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. नुकताच ॲपलचा मोठा विजय झाला. टीम कुक यांनीही नुकतीच जकार्ताला गेले होते. येथे त्यांनी इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांचीही भेट घेतली.
हेदेखील वाचा – BSNL देत आहे तुमच्या आवडीचा VIP मोबाईल नंबर, जाणून घ्या अप्लाय कसा करायचा
ॲपलसाठी ही एक आश्चर्यकारक बातमी असू शकते. कारण जेव्हा टीम कुक इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलले तेव्हा ही बैठक खूपच सकारात्मक वाटत होती. आता अशा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कंपनी आश्चर्यचकित होऊ शकते. बैठकीनंतर कुक यांनी इंडोनेशियामध्ये मॅनुफॅक्चरिंग प्लांट उभारण्याबाबतही चर्चा केली.