iPhone Tips: आयफोनच्या स्लो चार्जिंग समस्येने कंटाळलात का? आता या टीप्स वापरून पाहा
आयफोनच्या जगभरात असणाऱ्या क्रेझबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आयफोन त्याच्या कॅमेरा क्वालिटी आणि सिक्योरिटीसाठी खूप लोकप्रिय आहे. आयफोन सध्या जगभरात एक स्टेटस सिम्बॉल ठरत आहे. आयफोन म्हणजे हाय स्टँडर्ड असं एक उदाहरण सध्या निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही लोकं आयफोनचं कौतुक करून थकत नाही. पण सध्या आयफोनच्या कौतुकापेक्षा अनेकजण आयफोनबाबत निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करत आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आयफोन युजर्सना आयफोनच्या चार्जिंग स्पीडबद्दल अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक कंटेट क्रिएटर्स देखील आयफोनच्या चार्जिंग स्पीडबद्दल मजेदार कंटेट तयार करतात. सर्व स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे बॅटरी चार्जिंग स्पीड. ही समस्या आयफोन वापरकर्त्यांसाठी देखील सामान्य आहे, कारण कधीकधी चार्जिंगची स्पीड खूप कमी होते. त्यामुळे आयफोन चार्ज होण्यासाठी खूप वेळ लागतो. जर तुमचा आयफोन देखील हळू चार्ज होत असेल तर काही सोप्या टीप्स वापरून तुम्ही काही मिनिटांत आयफोन पूर्णपणे चार्ज करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
आयफोन चार्ज करण्यासाठी नेहमी ओरिजिनल चार्जर आणि केबल वापरा. ओरिजिनल नसलेले चार्जर वापरल्याने चार्जिंगच्या गतीवरच परिणाम होत नाही तर बॅटरीचे आयुष्यही कमी होऊ शकते.
चार्जिंग करताना फोन एरोप्लेन मोडवर ठेवल्याने बॅटरी जलद चार्ज होण्यास मदत होते. एरोप्लेन मोडवर, सर्व नेटवर्क कनेक्शन बंद केले जातात, जे बॅटरीवर कमी भार टाकतात आणि चार्जिंगला गती देतात.
आयफोन चार्ज करताना, नेहमी थंड ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा. उष्णता बॅटरीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते आणि चार्जिंगचा वेग कमी करू शकते.
तुमच्याकडे आयफोन 8 किंवा नवीन मॉडेल असल्यास, तुम्ही फास्ट चार्जिंग सपोर्टेड चार्जर वापरू शकता. यासाठी तुम्हाला 18W किंवा त्याहून अधिक क्षमतेचा चार्जर खरेदी करावा लागेल, जो आयफोन जलद चार्ज करू शकेल.
आयफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
चार्जिंग करताना बॅकग्राउंडमध्ये चालणारे ॲप्स बंद करा. बॅकग्राउंड ॲप्स बॅटरी वापरतात आणि चार्जिंगचा वेग कमी करू शकतात. बॅकग्राउंड ॲप्स बंद केल्याने तुम्ही तुमचा आयफोन लवकर चार्ज करू शकता.
चार्जिंग करताना तुम्हाला तुमचा आयफोन एरोप्लेन मोडमध्ये स्विच करायचा नसल्यास तुम्ही लो पावर मोडचा पर्याय वापरू शकता. अँड्रॉईडमध्ये हा पर्याय बॅटरी सेव्हर मोड असा असेल.
जर तुमचा आयफोन फास्ट चार्जिंग होत नसेल, तर आयफोन स्विचऑफ करा आणि चार्जिंगला लावा. यामुळे तुम्ही तुमचा आयफोन लवकर चार्ज करू शकता.