लवकरच लाँच होणार iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro स्मार्टफोन (फोटो सौजनय- iQOO )
Vivo ची सबब्रँड कंपनी iQOO लवकरच 2 नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच करणार आहे. टेक कंपनी iQOO त्यांचे नवीन स्मार्टफोन iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro हे 21 ऑगस्ट रोजी भारतात लाँच करणार आहे. iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro ह्या स्मार्टफोन्सच्या लाँचिंगपूर्वी कंपनीने टीझर जारी करत फोनची माहिती दिली आहे. iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro स्मार्टफोन्सच्या लाँचिंगपूर्वी कंपनीने त्यांचे स्पेसिफिकेशन्स जारी केले आहेत. हे दोन्ही फोन 4K OIS व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतील.
हेदेखील वाचा- Apple चे iPhone च्या सिक्युरिटी फिचर्सबाबत केले जाणारे दावे खोटे आहेत का? वाचा सविस्तर
कंपनीने स्मार्टफोन्सच्या प्रोसेसरची माहिती आधीच शेअर केली आहे. त्यानंतर आता बॅटरी चार्जिंग तपशील, कॅमेरा आणि इतर तपशील देखील समोर आले आहेत. MediaTek आणि iQOO Z9s Pro चे iQOO Z9s स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन चिपसेटसह रिलीज होणार आहेत. या दोन्ही फोनमध्ये 50 MP कॅमेरा सेन्सर असेल. iQOO Z9s सिरीजमधील दोन्ही फोन 5,500mAh बॅटरीसह प्रदान केले जाणार आहेत. iQOO Z9s आणि iQOO Z9s प्रो दोन्हीमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप प्रदान केला जाईल. यासोबतच फोनमध्ये AI फोटो एडिटिंग फीचर्स देखील उपलब्ध असतील. चला तर मग फोनच्या तपशीलांवर नजर टाकूया.
iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro स्मार्टफोन्समध्ये 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट असेल. त्याच्या प्रो मॉडेलमधील डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 4,500 निट्स असेल. या मालिकेतील दोन्ही स्मार्टफोन IP64-रेटिंगसह ऑफर केले जातील. स्मार्टफोन मालिकेसाठी तयार केलेल्या मायक्रोसाइटवरून ही माहिती समोर आली आहे.
iQOO Z9s सिरीजमधील दोन्ही फोन 5,500mAh बॅटरीसह प्रदान केले जातील. प्रो मॉडेलबद्दल कंपनीने सांगतिलं आहे की, ते 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीने अद्याप iQOO Z9s बद्दल माहिती दिलेली नाही.
हेदेखील वाचा- Made by Google इवेंटच्या लाईव्ह दरम्यान Gemini AI प्रश्नांची उत्तरं देण्यात ठरलं अयशस्वी
कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, iQOO Z9s आणि iQOO Z9s प्रो दोन्हीमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप प्रदान केला जाईल. फोनच्या प्रायमरी कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, यात 50-MP चा IMX882 इमेज सेन्सर असेल, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ला सपोर्ट करेल. iQOO Z9s मधील सेकेंडरी कॅमेरा 2 -MP चा असेल आणि Pro प्रकारात 8 -MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा असेल. हे दोन्ही फोन 4K OIS व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतील. यासोबतच फोनमध्ये AI फोटो एडिटिंग फीचर्स देखील उपलब्ध असतील.
कंपनीने iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro स्मार्टफोन्सच्या प्रोसेसरबद्दल माहिती शेअर केली आहे. IQ Z9S मध्ये MediaTek Dimensity 7300 प्रदान केला जाईल आणि Snapdragon 7 Gen 3 चिपसेट iQOO Z9s Pro मध्ये प्रदान केला जाईल.