Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनंत-राधिकाच्या लग्नानिमित्त JIO युजर्सना मिळणार 3 महिने फ्री रिचार्ज? जाणून घ्या सत्य काय

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्न सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहानंतर एक मॅसेज सर्वत्र व्हायरल होत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या निमित्ताने JIO यूजर्सना 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज देण्यात येणार आहे, असा दावा या मॅसेजमध्ये करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 16, 2024 | 10:25 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडीया

फोटो सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात या दोघांचे लग्न पार पडले. या लग्न सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या दोघांचा आशीर्वाद सोहळा देखील नुकताच पार पडला. आशीर्वाद सोहळा देखील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला देखील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहानंतर एक मॅसेज सर्वत्र व्हायरल होत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या निमित्ताने JIO यूजर्सना 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज देण्यात येणार आहे, असा दावा या मॅसेजमध्ये करण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेल्या मॅसेजमध्ये म्हटलं आहे की, ’12 जुलै रोजी झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या निमित्ताने, मुकेश अंबानी भारतातील सर्व JIO यूजर्सना 3 महिन्यांचा 799 रुपयांचा रिचार्ज मोफत देत आहेत. त्यामुळे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा नंबर चार्ज करा.’ महा कॅशबॅक नावाच्या अज्ञात साइटची लिंक देखील या मॅसेजमध्ये देण्यात आली आहे. मात्र हा मॅसेज बनावट असून संबंधित लिंकवर क्लिक केल्यास तुमची फसवूणक होऊ शकते. याबाबत JIO ने देखील माहिती दिली आहे.

कंपनी युजर्सना कोणताही मोफत डेटा प्लॅन ऑफर करत नाही. त्यामुळे युजर्सनी अशा प्रकारच्या मॅसेजवर विश्वास ठेऊ नये. अशा मॅसेजमुळे युजर्स मोठ्या घोटाळ्यात अडकू शकतात. हा मॅसेज खोटा असून अशी कोणतीही ऑफर कंपनीने सुरु केली नाही, असं JIO ने सांगितलं आहे.

दिवसेंदिवस सर्वसामान्यांची फसवणूक होण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. खोटे मॅसेज व्हायरल करून लोकांची फसवणूक केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच तुमच्या घराचा वीज पुरवठा खंडीत होणार आहे, असा मॅसेज देशभरातील लोकांच्या फोनवर आला होता. त्यानंतर तुमचं गॅस कनेक्शन बंद होणार आहे, असा मॅसेज अनेकांच्या फोनवर आला. मॅसेजमध्ये म्हटलं होतं की, ‘प्रिय ग्राहक. तुमच्या गॅस कनेक्शनचं बिल अपडेट झालेलं नाही. त्यामुळे तुमचं कनेक्शन तोडून टाकण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर फोन करा.’

तर दुसऱ्या मॅसेजमध्ये म्हटलं होतं की, ‘प्रिय ग्राहक, आज रात्री ९.३० वाजता तुमच्या घराची वीज कापली जाणार आहे. लवकरात लवकर आमच्या विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.’ या मॅसेजमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. लोकांची फवसणूक करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये दहशत पसरवण्यासाठी हा मेसेज पाठविण्यात आला असल्याचे समोर आले. हा मेसेज बनावट असून नागरिकांनी ह्या मेसेजवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन शासनाने केलं होतं. त्यानंतर आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या निमित्ताने JIO यूजर्सना 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज देण्यात येणार असल्याचा मॅसेज व्हायरल होत आहे.

Web Title: Jio users will get 3 months free recharge on the occasion of anant radhikas wedding know what the truth is

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2024 | 10:25 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.