स्मार्टफोनच्या जगात या देशांमध्ये आजही केला जातो पेजरचा वापर! वाचा संपूर्ण यादी (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
लेबनॉन आणि सीरियाच्या काही भागात काल पेजरचे ब्लास्ट झाले. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून 4000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पेजर हॅक करून लेबनॉन आणि सीरियाच्या सीमेला लागून असलेल्या काही भागात ब्लास्ट करण्यात आले. पण आता असा प्रश्न निर्माण होत आहे की, स्मार्टफोनच्या जगात देखील पेजर का वापरले जात आहेत? पेजर म्हणजे नक्की आहे तरी काय ज्यामुळे 4000 लोकं जखमी झाली आहेत? सर्वात आधी पेजर म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- इंस्टाग्रामने 18 वर्षांखालील युजर्ससाठी बदलले नियम, पालक नियंत्रित करणार अकाऊंट
पेजर हे एक लहान वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाइस आहे, जे विशेषतः संदेश पाठवण्यासाठी आणि संदेश प्राप्त करण्यासाठी वापरले जाते. त्याला बीपर देखील म्हणतात. 1980 आणि 1990 च्या दशकात जेव्हा मोबाईल फोनचा वापर मर्यादित होता तेव्हा पेजरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. परंतु सध्याच्या या डिजीटल आणि स्मार्टफोनच्या जगात अनेकांना पेजरबद्दल माहीती देखील नाही. पूर्वीच्या काळात ते खूप लोकप्रिय होते.
पूर्वी पेजर भारतासह जगभरात लोकप्रिय होते. हे विशेषतः डॉक्टर, व्यापारी आणि आपत्कालीन सेवा व्यावसायिकांनी वापरले होते. पेजर उपकरणे रेडिओ सिग्नलद्वारे मजकूर संदेश पाठवतात आणि प्राप्त करतात. हे प्रामुख्याने तेव्हा उपयुक्त होते जेव्हा मोबाइल फोन इतके लोकप्रिय नव्हते आणि मोबाइल सेवा खूप महाग होती. परंतु हळूहळू मोबाईलने संपूर्ण जग व्यापलं आणि पेजरचा वापर कमी होऊ लागला. सध्याच्या तरूणाईला पेजरबद्दल विचारलं तर त्यांच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
हेदेखील वाचा- China Black Myth video game: चीनचा वुकाँग गेम भारताच्या जोरावर होतोय लोकप्रिय, काय आहे कनेक्शन? वाचून बसेल धक्का
अजूनही अनेक क्षेत्रे आहेत जिथे इंटरनेट कव्हरेज खूपच खराब आहे. अनेक वेळा तेथे कॉल, मेसेज आणि इंटरनेट इत्यादींचा वापर करता येत नाही. अशा परिस्थितीत पेजरची मोठी भूमिका बजावते. कमकुवत नेटवर्क भागातही पेजर सहज कार्य करू शकते. वापरकर्त्यांना पेजरमध्ये मजबूत बॅटरी लाइफ मिळते. एका चार्जवर ते आठवडाभर चालवता येते. पेजर मोबाईलपेक्षाही वेगाने संदेश पाठवते. परंतु पेजरची सुरक्षा व्यवस्था फारशी मजबूत नाही. पेजर सिस्टीम एनक्रिप्टेड नसल्यामुळे त्यात असलेला डेटा कॅप्चर करून हॅक केला जाऊ शकतो.