meta ai chatbot, whatsapp, how to use meta ai chatboon whatsapp, tech news, meta lauched ai chatbot in india, व्हॅट्सऍप कसा वापरावा AI चॅटबॉट
मेटाने भारतात आपला AI चॅटबॉट रोलआऊट करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळेच आता भारतीय यूजर्स मेटाचा AI चॅटबॉट विनामूल्य अगदी मोफत वापरू शकणार आहेत. आता यूजर्स हा फेसबुक व्यक्तिरिक्त कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जसे की व्हॅट्सऍप, इंस्टग्रामवर याचा वापर करू शकतात, तेही कोणतेही पैसे खर्च न करता.
मेटाच्या या AI चॅटबॉटची खास गोष्ट ही आहे की, हा यूजर्सना टेक्स्ट व्यतिरिक्त फोटोज जनरेट करण्याचा ओप्शनही उपलब्ध करून देतो. ज्याच्या मदतीने यूजर्स त्यांचे काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील. आता व्हॅट्सऍपवर या AI चॅटबॉटचा वापर कसा करावा, याविषयी आम्ही सविस्तर सांगणार आहोत.
जेव्हा तुम्ही सर्चबारमध्ये टाइप करता तेव्हा तुम्हाला रिजल्स प्रदर्शित होतात, यावेळी तुम्ही मेटा AI ला प्रश्न विचारू शकता. जोपर्यंत तुम्ही मेटा AI ला प्रश्न विचारात नाहीत तोपर्यंत तो तुमच्या मेसेजशी कनेक्ट होत नाही. यासाठी तुम्ही व्हॉट्सॲपवर सर्च फीचर वापरणे सुरू ठेवू शकता आणि चॅटमधील मेसेज, फोटो, व्हिडिओ, लिंक्स, GIF, ऑडिओ, पोल आणि डॉक्युमेंट्स शोधण्यासाठी सर्च बारवर जाऊ शकता. यामुळे तुमच्या पर्सनल चॅटचे कोणतेही नुकसान होत नाही.