फोटो सौजन्य -iStock
जगप्रसिध्द टेक कंपनी Microsoft ने एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनमधील Microsoft कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना Android स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घातली आहे. कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना iPhone वापरण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कंपनी स्वत: त्यांच्या कर्मचाऱ्यांना iPhone 15 देणार आहे. हॉंगकॉंगमधील ऑफीसमध्ये देखील Microsoft कंपनीने हा निर्णय लागू केला आहे. कंपनी एवढा खर्च का करत आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. Microsoft कंपनीने सायबर सुरक्षा आणि डेटा सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
Microsoft ने आपल्या सुरक्षेबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. यामुळे, कंपनीमध्ये असे अनेक बदल केले जात असून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. या महत्तवपूर्ण निर्णयांमुळे कंपनी सायबर सुरक्षा आणि डेटा हॅक यांसारख्या समस्यांना मागे टाकून आणखी प्रगती करू शकेल. याच पार्श्वभूमीवर आता कंपनीने Android स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये Google Play Store वर बंदी आहे. Google Play Store उपलब्ध नसल्याने चीनमधील Android युजर्सना ॲप्स डाउनलोड करण्यासाठी Huawei आणि Xiaomi सारख्या स्थानिक अॅप स्टोअर्सवर अवलंबून राहावे लागते.
अनेकदा Android युजर्सच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळेच आता Microsoft ने कर्मचाऱ्यांना Android ऐवजी iPhone वापरण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी कंपनी स्वत: त्यांच्या कर्मचाऱ्यांना iPhone 15 देणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे Microsoft चीनमधील कर्मचाऱ्यांना आता एकसारखे डिव्हाइस वापरण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आता लवकरच चीनमधील Microsoft कंपनीत Android बंद होऊन iPhone पाहायला मिळणार आहे. सप्टेंबरपासून कंपनी Android स्मार्टफोनवर बंदी घालणार आहे. हा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या ग्लोबल सिक्युर फ्युचर इनिशिएटिव्ह (SFI) चा एक भाग आहे.ब्लूमबर्गने दिलेल्या अहवालानुसार, कंपनीला वारंवार हॅकर्सच्या हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. जानेवारीमध्ये अमेरिकेच्या डझनभर सरकारी संस्थांवर याचा परिणाम झाला. त्यामुळे आता Microsoft ने सुरक्षा अधिक मजबुत करण्याचा निर्णय घेतला आहे.
Microsoft लवकरच एक नवीन लॉगिन सिस्टिम लाँच करणार असल्याचं समोर आलं आहे. कंपनीच्या या लॉगिन सिस्टिममुळे कोणता कर्मचारी iPhone वापरत आहे आणि कोणता कर्मचारी Android चा वापर करत आहे, हे ओळखता येईल. या नवीन लॉगिन सिस्टिममुळे कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांच्या डिव्हाइसवर अधिक कंट्रोल मिळेल. तसेच एकसारखे डिव्हाइस वापरल्यामुळे IT व्यवस्थापन देखील अधिक सोपं होणार आहे. Google Play store च्या कमतरतेमुळे, Huawei आणि Xiaomi सारखे स्थानिक स्मार्टफोन ब्रँड त्यांचे स्वतःचे प्लॅटफॉर्म सादर करत आहेत. Google Play Store उपलब्ध नसल्याने चीनमधील Android युजर्सना ॲप्स डाउनलोड करण्यासाठी Huawei आणि Xiaomi सारख्या स्थानिक अॅप स्टोअर्सवर अवलंबून राहावे लागते. देशात गुगलची मोबाइल सेवा नसल्यामुळे मायक्रोसॉफ्टचा हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.