फोटो सौजन्य - सोशल मिडीया
ऑनलाइन टॅक्सी कंपनी OLA आता लवकरच किराणा सुध्दा डिलीव्हरी करणार आहे. यासाठी कंपनीने ONDC या डिलीटल प्लॅटफॉर्मची निवड केली आहे. OLA लवकरच ही सेवा करणार आहे. सध्या ऑनलाईन शॉपिंग आणि ऑनलाईन किराणा सामान मागविण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. बाजारात जाऊन सामान घेऊन येण्यापेक्षा अनेकजण ऑनलाईन सामान ऑर्डर करतात. असे अनेक अॅप्स आहेत, जे तुमच्या सामानाची अगदी तासाभरात डिलीव्हरी करतात. त्यामुळे तुम्हाला बाजारात जाऊन सामान घेण्याचा वेळ वाचतो. दिल्ली-एनसीआरसह मेट्रो शहरांमध्ये असे प्लॅटफॉर्म लोकप्रिय होत आहेत. आता OLA सुध्दा लवकरच ऑनलाईन सामान डिलीव्हरी करणार आहे.
OLA ने यापूर्वी २०१५ मध्ये देखील ऑनलाईन सामान डिलीव्हरी करण्याची सेवा सुरु केली होती. यासाठी फूड डिलीव्हरी अॅप देखील लाँच करण्यात आलं होतं. OLA ने मुंबई आणि बंगळुरुमध्ये स्टँडअलोन ऑनलाइन किराणा दुकान सुरू केलं होतं. कॅब ड्रायव्हर सकाळी 9 ते 11 ऑनलाईन सामानाची डिलीव्हरी करू शकतील, अशी यामागची योजना होती. यासाठी १५ ऑनलाइन किराणा दुकान सुरू करण्यात आली होती. मात्र अवघ्या वर्षभरातच ही सेवा बंद करण्यात आली. मात्र आता OLA सुध्दा लवकरच ऑनलाईन सामान डिलीव्हरी करणार आहे.
यासोबतच OLA चे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. OLA आता नेव्हिगेशनसाठी गुगल मॅपची मदत घेणार नाही. कंपनीने स्वत:च्या नकाशा प्लॅटफॉर्म Ola Maps वर शिफ्ट होण्याची घोषणा केली आहे. यामुळे मॅप सेवेच्या खर्चात दरवर्षी १०० कोटी रुपयांची बचत होऊ शकते. याबाबत OLA चे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी एक निवदेन जारी केलं आहे. निवेदनात म्हटलं आहे की, गेल्या महिन्यात Azure मधून बाहेर पडल्यानंतर आम्ही आता Google Maps मधून देखील पूर्णपणे बाहेर पडलो आहोत. आम्ही यासाठी दरवर्षी 100 कोटी रुपये खर्च करायचो, परंतु या महिन्यात आम्ही आमच्या इन-हाऊस ओला मॅप्समुळे हा खर्च शून्यावर आणला आहे.