OnePlus Event: वनप्लस 'विंटर लाँच इव्हेंट' चं आयोजन, स्मार्टफोनपासून इअरबड्सपर्यंत हे गॅझेट्स होणार लाँच
2025 हे वर्ष टेक क्षेत्रासाठी अतिशय खास असणार आहे. नवीन वर्षात नवीन गॅझेट्स नवीन टेक्नोलॉजीसह लाँच केले जाणार आहेत. या लाँचिंगची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. जानेवारी 2025 मध्ये अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. यासाठी लाँचिंग ईव्हेंट देखील आयोजित करण्यात आले आहेत. जानेवारी महिन्यात टेक कंपनी वनप्लसने त्यांच्या ‘विंटर लाँच इव्हेंट’ चं आयोजन केलं आहे. या ईव्हेंटबद्दल कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे.
Google Map Update: गुगल मॅपचे हे 12 सीक्रेट फीचर्स तुमच्यासाठी ठरतील वरदान!
वनप्लस विंटर लाँच इव्हेंटमध्ये स्मार्टफोनपासून इअरबड्सपर्यंत अनेक नवीन गॅझेट्स लाँच होणार आहेत. त्यामुळे जानेवारी 2025 हा काळ टेकसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या महिन्यात कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. वनप्लस विंटर लाँच इव्हेंटमध्ये दोन नवीन फोन आणि इअरबड्स लाँच केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. (फोटो सौजन्य – X)
वनप्लस जानेवारीमध्ये ‘विंटर लाँच इव्हेंटचं’ आयोजन करणार आहे. हा कार्यक्रम 7 जानेवारी 2025 रोजी लाईव्ह होईल. यामध्ये, ब्रँड जागतिक आणि भारतीय बाजारपेठेत पुढील अनेक डिव्हाइस लाँच करण्याची शक्यता आहे. OnePlus विंटर लाँच इव्हेंट 7 जानेवारी रोजी सकाळी 10:30 AM EST म्हणजेच 4:30 PM CET ला लाईव्ह होईल. भारतीय वापरकर्ते रात्री 9 वाजल्यापासून ते लाईव्ह पाहू शकतील. त्याची स्ट्रीमिंग वनप्लस इंडियाच्या यूट्यूब चॅनलवर असेल.
It’s time to experience unmatched speed, refined craftsmanship, and effortless innovation. Inspired by the Never Settle spirit, get ready to meet the all-new #OnePlus13 Series on January 7, 2025
— OnePlus India (@OnePlus_IN) December 17, 2024
या इव्हेंटमध्ये कंपनी आपली नेक्स्ट जेन फ्लॅगशिप OnePlus 13 सीरीज लाँच करेल. OnePlus 13 मध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट सोबत 16GB पर्यंत RAM आणि 1TB स्टोरेज असण्याची अपेक्षा आहे. हा फोन Android 15 वर आधारित OxygenOS 15 वर चालेल. याच्या मागील बाजूस वीगन लेदर फिनिश असेल. फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली जाऊ शकते जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याला IP69 रेटिंग मिळाले असते. OnePlus 13 5G मिडनाईट ओशन, ब्लॅक एक्लिप्स आणि आर्क्टिक डॉन शेड्समध्ये उपलब्ध होऊ शकतो.
विंटर लाँच इव्हेंटमध्ये OnePlus 13R देखील लाँच होण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. OnePlus 13R मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच AMOLED स्क्रीन असेल. यामध्ये Snapdragon 8 Gen 3 चिपसेट दिला जाऊ शकतो. OnePlus 13R 5G मध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असेल. हा फोन Android 15 वर आधारित OxygenOS 15 वर चालेल.
OnePlus 13R ला ट्रिपल लेन्स सेटअप मिळेल, ज्यामध्ये समोर 50MP+8MP+50MP सेन्सर आणि 16MP सेन्सरचा समावेश आहे. OnePlus 13R 5G मध्ये 6000mAh बॅटरी दिली जाऊ शकते जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन OnePlus 12R पेक्षा लहान आणि पातळ असेल. फो नेबुला नॉयर आणि एस्ट्रल ट्रेल शेड्समध्ये उपलब्ध होऊ शकतो.
AI व्हॉट्सॲपवरही दाखवणार चमत्कार! रोल आऊट झाले दोन नवीन फीचर्स, अशा प्रकारे ठरतील फायदेशीर
नेक्स्ट जेन स्मार्टवॉच OnePlus Watch 3 देखील OnePlus इव्हेंट दरम्यान लाँत केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी घड्याळाचे एफसीसी सर्टिफिकेशन दिसले होते, ज्यामुळे हे स्मार्टवॉच देखील लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. स्मार्टवॉच वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि एनएफसीला सपोर्ट करेल. OnePlus Buds 4 TWS आणि OnePlus Pad 2 Go देखील इव्हेंटमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. मात्र या दोन्ही डिव्हाईसचे डिटेल्स अद्याप समोर आलेले नाही.